Download App

विधानसभेला ठाण्यातील सापांचा फणा ठेचणार…; राऊतांचा CM शिंदेंवर हल्लाबोल

लोकसभेत सापांच्या शेपट्या वळळवत राहित्या. मात्र, विधानसभेला या सापांचे फणे ठेचल्या शिवाय राहणार नाही, असा इशारा राऊतांनी दिला.

  • Written By: Last Updated:

Sanjay Raut : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी (Vidhansabha Election) सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये टीकेच्या फैरी झडत आहेत. आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊ (Sanjay Raut) यांनी मुख्ममंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर जोरदार टीका केली. लोकसभेत सापांच्या शेपट्या वळळवत राहित्या. मात्र, विधानसभेला या सापांचे फणे ठेचल्या शिवाय राहणार नाही, असा इशारा राऊतांनी दिला.

वाद पेटला ! उद्धव ठाकरेंच्या ठाण्यातील सभेच्या ठिकाणी मनसेचा राडा ! 

ठाकरे गटाचा मेळावा आज ठाण्यातील गडकरी रंगायतनमध्ये सुरू आहे. या मेळाव्याला ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, राजन विचारे, केदार दिघे आदी नेते उपस्थित होते. यावेळी संबोधित करतांना राऊत म्हणाले की, आज शिवसेनेचे पक्ष प्रमुख ठाण्यात आले तेव्हा मुलूंड, घाटकोपरपासून लोकांनी त्याचं स्वागत केलं. लोक दोन्ही बाजूंनी रस्त्यावर उभे होते. कारण, ठाणं हे शिवसेनेचं आहे. चोरलेल्या शिवसेनेचं नाही. तर जी शिवसेना बााळासाहेब ठाकरेंनी स्थापन केली, ज्या ठाण्याने बाळासाहेबांना पहिला राजकीय विजय मिळवून दिला, त्या शिवसेनेचं ठाणं आहे, ठाणं गद्दारांचं नाही, अशा शब्दात राऊतांनी टीका केली.

राऊत म्हणाले की,भगवा सप्ताह काल व्हायला हवा होता. कारण, काल नागपंचमी होती. ज्या सापांना आपण इतकी वर्ष दूध पाजलं, त्या सापांचे फणे ठेण्यासाठी कालचं ठाण्यात आलो असतो. लोकसभेत या सापांच्या शेपट्या वळवळत राहिल्या. पण, आता विधानसभेत त्यांचे फणे ठेचल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा राऊतांनी दिला.

शिवसेना ही भगव्याची रखवलदार आहे. तर शिंदेंच जगवा आहे. ते दिल्लीत जातात अन् साहेब आम्हाला जगवा अशी विनवणी करतात. त्यांचा भगवा असूच शकत नाही, असंही राऊत म्हणाले.

नमक हराम-2 ची स्क्रिप्ट तयार
ठाण्यातील लोक सध्या फार सिनेमे काढतात. विधासनभा जवळ आल्या की शिंदे सिनेमे काढतात. ते मुख्यमंत्री आहेत की, फिल्म प्रोड्यूसर आहेत, असा सवाल राऊतांनी केला. मलाही एक सिनेमा काढायचा. माझ्याकडे नमक हराम-2 ची स्क्रिप्ट तयार आहेत. त्यात ठाण्यातील सगळ्या हरामखोरांवर प्रकाश टाकणार, अशी टीका राऊतांनी केली.

 

follow us