Download App

नागपुरी थकला म्हणून ठाण्याचा आणला, त्याच्याकडून जमेना म्हणून बारामतीचा, तोही पुरेना…; राऊतांची बोचरी टीका

  • Written By: Last Updated:

Sanjay Raut : काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये (NCP) फुट पडली. अजित पवार गट सत्तेत सहभागी झाला. आपण विकास करण्यासाठी सत्तेमध्ये आलो असल्याचं अजित पवार (Ajit Pawar) गटाकडून सांगण्यात आलं. त्यानंतर आता ऐन लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha elections) तोंडावर अनेक नेते भाजपची वाट धरत आहे. त्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) भाजपवर (BJP) जोरदार टीका केली. नागपुरी थकला म्हणून ठाण्याचा आणला, नंतर बारामतीचा आणला आणि आता नांदेडवाल्याचा हात धरला, आता तरी कमळाबाईच्या पोटी विकास पैदा होता का? अशी बोचरी टीका राऊतांनी केली.

मोठी बातमी : लोकसभा तोंडावर असतानाच निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांचा राजीनामा 

गद्दारांना माफी नाही
भोर तालुक्यातील हरिश्चंद्री येथे आज महाविकास आघाडीची सभा झाली. या सभेत बोलतांना राऊतांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. ते म्हणाले की, शरद पवार हे राजकारणातले पितामह आहेत. मी भीष्म पितामह म्हणणार नाही. कारण भीष्म हे कौरवांच्या बाजून होते. शेवटच्या क्षणी भीष्म लढले नाहीत. मिात्र, आमचा पितामह अजून मैदानात उभा आहे. लढतो आहे. लढणाऱ्यांचा इतिहास लिहिल्या जातो, पळपुट्यांचा लिहिल्या जात नाही, अशी टीका त्यांनी नाव न घेता अजितदादा गटावर केली. समोर बसलेले आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले सगळे लढणाऱ्यांची फौज आहे, सुप्रियाताईंनी म्हटल्याप्रमाणे शेतकऱ्यांचे कर्ज माफ नक्कीच करू, पण गद्दारांना माफ कऱणार नाही, असंही राऊत म्हणाले.

विश्वासघातकी राजकारण खेळलं गेलं; भास्कर जाधवांच्या मनातील खदखद बाहेर पडणार ! 

कमळाबाईच्या पोटी विकास पैदा होतो?
विकासाच्या नावाखाली लोक सोडून गेले. कशाला जातो रे तू? विकास करायला जातो. भारतीय जनता पक्ष हा जगातील सर्वात मोठा पक्ष म्हणे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विकासपुरुष, अमित शाह यांना विकासाची काय दृष्टी आहे? त्यांना विकास करायला राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसच्या लोकांची गरज पडते. माझ्या त्या दिवशी अतिशय सुंदर कविता वाचण्यात आली. ती अशी… नागपुरी थकला म्हणून ठाण्याचा आणला, त्यांच्याकडून जमेना म्हणून बारामतीचा बघितला. तो पुरेना म्हणून नांदेडवाल्याचा हात धरला. बघू आता तरी कमळाबाईच्या पोटी विकास पैदा होतो का, अशी बोचरी टीका राऊतांनी केली.

राऊत म्हणाले, पवार साहेबांनी मला स्टेजवरून दाखवले, बघा इथे किती पांढऱ्या टोप्या आहेत. सूर्य मावळल्यानंतर, या प्रकाशात टोप्या अजून उजळून निघाल्या. या चकचकीत टोल्या भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये धुवून निघाल्या नाहीत. या ओरीजनल, प्रामाणिक टोल्या आहेत आणि मुख्यत: बदलणाऱ्या टोप्या नाहीत, असंही राऊत म्हणाले.

राऊत म्हणाले की, ही लढाई बारामतीची लढाई नसून महाराष्ट्राच्या अस्मितेची लढाई आहे. महाराष्ट्रातील लढाई ही मोदी विरुध्द शरद पवार अशी आहे. मोदी विरुध्द उद्धव ठाकरे अशी ही लढाई आहे. मराठ्यांनी मोगलांना पाणी पाजलं. आता जर गुजरात राज्य महाराष्ट्राला ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत असेल तर शिवरायांचा मावळे अजून जिवंत आहेत, तुम्हाला पाणी पाजल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही राऊतांनी दिला.

जनता तडीपार करेल
मिशन ४५ अशी घोषणा अमित शाहांनी केली. मिशनच्या गोष्टी तुम्ही करू नका. तुम्ही कमिशनच्या गोष्टी करा. तुमचा पक्ष कमिशनवर पोसल्या जातो. ४५ पार काय, चार पाच जिकल्या तरी पुरे. मोदी म्हणतात, अब की बार ४०० पार… ४०० पार नाही, अबकी बार भाजपा तडीपार.. तुम्ही आमच्या कार्यकर्त्यांना तडीपारच्या नोटीसा देता. नेत्यांना ईडी, सीबीआयच्या नोटीसा देता. त्यामुळं लोकसभा निवडणुकीत जनता तुम्हाला तडीपाराची नोटीस दिल्याशिवाय राहणार नाही, असं राऊत म्हणाले.

follow us