विश्वासघातकी राजकारण खेळलं गेलं; भास्कर जाधवांच्या मनातील खदखद बाहेर पडणार !

  • Written By: Published:
विश्वासघातकी राजकारण खेळलं गेलं; भास्कर जाधवांच्या मनातील खदखद बाहेर पडणार !

MLA Bhaskar Jadhav emotional letter to shivsena workers : शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाचे नेते व आमदार भास्कर जाधव (MLA Bhaskar Jadhav) हे नेहमी आक्रमक शैलीत बोलतात. तसेच आक्रमकपणे राजकीय निर्णय जाहीर करतात. आता आमदार भास्कर जाधव यांनी आपले कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसाठी एक पत्र लिहिले. पत्रातील भाषा ही भावनिक आहे. तसेच ते रविवारी (10 मार्च) सकाळी अकरा वाजता चिपळूनला कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहे. एका अर्थाने त्यांची ही सभाच आहे. पत्रातील भाषा पाहिल्यास भास्कर जाधवांच्या मनातील खदखद बाहेर पडणार आहे. ते वेगळे राजकीय निर्णय घेण्याची शक्यता असल्याची चर्चा सुरू झाली आहे.


लोकसभा निवडणुकीत तुम्ही माझी काळजी घ्या, मग मी…; पंकजा मुडेंनी दिले लोकसभा लढण्याचे संकेत

आज माझ्या राजकीय, सामाजिक कारकीर्दीचे सिंहावलोकन करताना मला १९८५ पासून साथ देणाऱ्या माझ्या चिपळूण मतदारसंघातील तसेच २००७ पासून मला साथ देणाऱ्या गुहागर विधानसभा मतदारसंघातील माझ्या सहकाऱ्यांचे ऋण व्यक्त करावेसे वाटतात. अनेक नेते हे सर्वांना संबोधितांना कार्यकर्ते असं बोलताना मी पाहिले आहे, परंतु मी कायम आपणा सर्वांना सहकारी म्हणूनच संबोधले. होय, तुम्ही सर्व माझे सहकारीच आहात.तुम्ही सर्वांनी मला साथ दिलीत आणि त्याच ऊर्जेतून मी विकासाच्या रूपाने तुमच्या वैयक्तिक अडचणींमध्ये अथवा सार्वजनिक स्वरूपात खंबीरपणे तुमच्या पाठी उभा राहिलोय. अनेक दिग्गज मातब्बरांविरोधात प्रसंगी संघर्षही केलाय, असे जाधव यांनी पत्रात म्हटलंय.

वंचित आणि महाविकास आघाडीची युती होणार नाही; शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान

स्वतःचे कुटुंब माता शारदादेवीच्या हवाली सोडून राना-वनात भटकून तुम्हा सर्वांना न्याय मिळवून देण्यासाठी व शिवसेना वाढविण्यासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही. या सर्व कालखंडात माझ्या वक्तृत्व आणि कर्तृत्वामुळे मी यशाची अनेक शिखर पार करू शकलो. मित्रांनो, गेली ४२ वर्ष सातत्याने राजकारणात एकेक पायरी वर चढण्याचा मान या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तुमच्या भास्कर जाधवलाच मिळालाय. आज वंदनीय बाळासाहेबांनी वाढवलेली शिवसेना अडचणीत असताना मी कोणत्याही दबावाला अगर संकटांना यत्किंचितही न घाबरता उद्धवसाहेबांच्या मागे खंबीरपणे उभा आहे. महाराष्ट्रभर फिरून उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा आवाज बुलंद करण्याचा मी माझ्या परीने प्रयत्न करत आहे. हे करत असताना कधी माझ्यावर शारीरिक तर कधी माझ्या घरावर तर कधी माझ्या कार्यालयावर वरचेवर हल्ले होतच आहेत. आता तर मला जीवनातून संपवून टाकण्याची भाषा एका राष्ट्रीय पक्षाच्या अधिकृत व्यासपीठावरून जाहीरपणे केली जात आहे, असे भास्कर जाधव यांनी म्हटले आहे.

अशातच ४० वर्षांपासूनचे माझे जुने-जाणते वयोवृध्द तसेच नवीन व ताज्या दमाचे सहकारी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत, हे पाहिल्यावर माझा उर भरून येतो व आजही आपण अन्यायाच्या, गुंडगिरीच्या आणि विश्वासघाताच्या विरोधात लढलं पाहिजे, ही उर्जा मिळते, असा विश्वास भास्कर जाधवांनी व्यक्त केलाय.

माझ्यासोबत विश्वासघातकी राजकारण खेळलं गेलं आहे. पण, या सगळ्या वाटचालीत व संघर्षामध्ये माझा वैयक्तिक स्वार्थ तरी काय ? या व अशा अनेक विषयांवर मला तुमच्याशी बोलायचं आहे. मनात काही खंत आहेत, त्याही उघड करायच्या आहेत. यातून हेतू एकच आहे, शिवसेनेचा भगवा पुन्हा एकदा डौलाने फडकवायचा असल्याचे भास्कर जाधवांनी म्हटले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज