उद्धव ठाकरे मोदी-शाह जोडीला खत्रूड म्हणतात… पण त्यांनी तर जुन्या दोस्तांनाही जिंकलं आहे…

उद्धव ठाकरे मोदी-शाह जोडीला खत्रूड म्हणतात… पण त्यांनी तर जुन्या दोस्तांनाही जिंकलं आहे…

बिजू जनता दल दुरावला, तेलगू देसम पक्ष दुरावला, शिवसेना दुरावली, अकाली दल दुरावला, जनता दल संयुक्त दुरावला, जनता दल धर्मनिरपेक्ष दुरावला… मागच्या एका तपापासून भाजपपासून अनेक मित्र पक्ष दुरावले. केंद्रातील दोनवेळा आलेली पूर्ण बहुमतातील सत्ता, अनेक राज्यांमध्ये वाढलेली कमालीची ताकद, इतर पक्षांमधून आलेले आणि स्थिरावलेले असंख्य नेते यामुळे मित्र पक्षांना संभाळून घेणे, नाराज झाल्यानंतर त्यांची समजूत काढणे, अडचणीच्या मुद्द्यांवेळी त्यांना गोंजारणे या गोष्टी जणू बंदच केल्या होत्या. (BJP has brought closer all the allies who had drifted away from NDA in the last ten years)

या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून 1990 च्या दशकात वाजपेयी-अडवानी या जोडीने जे मित्र पक्ष जमवले होते ते मित्र पक्ष एक एक करुन सोडून जात होते. पण आता मात्र भाजपने (BJP) कुस बदलल्याचे दिसून येत आहे. मागच्या काही महिन्यात भाजपने आपल्यापासून दुरावलेल्या जवळपास सर्वच मित्रपक्षांना पुन्हा जवळ आणले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) तोंडावर या घडामोडी घडत असल्या तरीही मागील दहा वर्षात पहिल्यांदाच भाजपने मित्र पक्षांना सोबत आणण्यासाठी एवढे प्रयत्न केल्याचे दिसून येते आहे.

कोणत्या पक्षांना पुन्हा सोबत आणले?

2009 मध्ये जागा वाटपाची बोलणी फिस्कटल्यानंतर भाजपपासून ओडिसातील बिजू जनता दल दुरावला. पण आता बिजू जनता दल पुन्हा भाजपसोबत येणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे. 2018 मध्ये आंध्र प्रदेशला विशेष दर्जाची आणि पॅकेजची मागणी पूर्ण न केल्याने भाजपसोबत काडीमोड घेतला. आता लोकसभा निवडणुका आणि आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुका या पार्श्वभूमीवर तेलगु देसम पक्षाने नुकतेच भाजपसोबत पुन्हा युतीची घोषणा केली आहे. 2019 मध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांनंतर शिवसेना भाजपपासून लांब गेली. 2022 मध्ये भाजपने एकनाथ शिंदे यांना सोबत घेत पुन्हा शिवसेनेला एनडीएमध्ये आणले.

भाजपचे गुजरात प्रदेशाध्यक्ष दोन्ही मुलींचे राजकारण ‘महाराष्ट्रात’ करणार सेट : दोन मतदारसंघांमध्ये चर्चा

अवघ्या वर्षभरात राष्ट्रवादी काँग्रेसलाही सोबत घेतले. 2022 मध्ये लांब गेलेल्या आणि विरोधकांच्या इंडिया आघाडीची स्थापना करण्यात पुढाकार घेतलेल्या नितीश कुमार यांना देखील पुन्हा आपल्या गोटात आणले. कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर धर्मनिरपेक्ष जनता दलाशी पुन्हा मैत्री केली. आता शेतकरी कायद्यांना विरोध करुन लांब गेलेल्या शिरोमणी अकाली दलासोबत पुन्हा युती करण्यासाठी भाजपचे केंद्रीय नेते प्रयत्नशील आहेत. त्यासाटी माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे निकटवर्तीय सुखदेवसिंग धिंडसा यांना जबाबदारी देण्यात आली आहे. उत्तर प्रदेशमध्ये जयंत चौधरी यांना भाजपने आपल्या युतीत आणले आहे.

अनेक नेत्यांना भाजपमध्ये पायघड्या :

महाराष्ट्रापासून अरुणाचल, पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूपर्यंत इतर पक्षांचे अनेक नेते काळात भाजपमध्ये दाखल झाले आहेत. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली, तर पश्चिम बंगालचे तपस रॉय यांनी तृणमूल सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये काँग्रेसच्या चारपैकी तीन आमदार, बिहारमध्ये राष्ट्रीय जनता आणि अर्धा डझनहून अधिक काँग्रेस आमदारांनी आतापर्यंत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. गुजरात काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अर्जुन मोधवाडिया, माजी आमदार अंबरिश डेर आणि तामिळनाडूमध्येही अण्णा द्रमुक मुन्नेत्र कळघमच्या 16 माजी आमदार आणि माजी खासदारांनीही भाजपची वाट धरली आहे.

मित्राला दिलेला दम पवारांनी लक्षात ठेवला… शेळकेंना त्यांच्याच मतदारसंघात जाऊन दिली तंबी

याशिवाय उत्तर प्रदेशमधील समाजवादी पक्षाचे मुख्य प्रतोद मनोज पांडे, पवन पांडे, पूजा पाल यांच्यासह सात आमदार, हिमाचलमध्ये काँग्रेसच्या राजेंद्र राणा यांच्यासह सहा आमदार ज्यांनी भाजप उमेदवाराच्या बाजूने क्रॉस व्होट केले होते. हे सर्वजण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. केरळमध्ये एके अँटोनी यांचा मुलगा अनिल अँटोनी यांच्यानंतर आता माजी मुख्यमंत्री के करुणाकरन यांची कन्या पद्मजा वेणुगोपालही भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. या पुढील काळात अनेक बडे नेते भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. यात मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांचे नाव आघाडीवर आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज