Download App

टीका करणं योग्य नाही, कितीही झालं तरी अजित पवार माझे काका; राऊतांनी केलेल्या टीकेवर युगेंद्र पवारांचा आक्षेप

कोणाच्या बोलण्यावर कंट्रोल ठेवता येत नाही. कितीही झालं तरी अजित पवार हे माझे काका आहेत, राऊतांनी अशी टीका करणं योग्य नाही - युगेंद्र पवार

  • Written By: Last Updated:

Yugendra Pawar on Sanjay Raut : आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये टीकेच्या फैरी झडत आहेत. आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर (Ajit Pawar) जोरदार टीका केली. राऊतांनी अजित पवारांचा उल्लेख गुलाबी सरडा असा केला. त्या टीकेवर आता शरद पवार गटाचे युवा नेते युगेंद्र पवार (Yugendra Pawar) यांनी आक्षेप घेतला आहे.

‘ही बालिशबुद्धी आहे’, हॉटेल राजकारणावरून महेश लांडगेंनी लावला अमोल कोल्हेंना टोला 

कोणाच्या बोलण्यावर कंट्रोल ठेवता येत नाही. कितीही झालं तरी अजित पवार हे माझे काका आहेत, राऊतांनी अशी टीका करणं योग्य नाही, असं युगेंद्र पवार म्हणाले.

युगेंद्र पवार यांना प्रसारमाध्यांनी राऊतांनी केलेल्या टीकेविषयी विचारले. त्यावर बोलताना युगेंद्र पवार म्हणाले की, महाविकास आघाडीच्या निर्धार मेळाव्यात मी खाली बसलो होतो. ते स्टेजवर बसले होते. ते काय बोलतील यावर आमचा कंट्रोल नाही. काही गोष्टींबद्दल ते जे काही बोलतील ते सगळंचं आम्हाला आवडतं किंवा पटतं असं नाही. कारण शेवटी कौटुंबिक संबंध देखील आहेत, असं युगेंद्र म्हणाले.

Marathi Natak : ‘अलबत्या गलबत्या’च्या विक्रमी प्रयोगांना प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद 

ते पुढे म्हणाले की, राजकारण बाजूला ठेवले तर ते माझे काका आहेत. त्यामुळे सगळेचं जेव्हा त्यांच्यावर टीका करतात, तेव्हा प्रत्येकाची टीका आवडतेच असं नाही. राऊतांनी अशी टीका करणं योग्य नसल्याचं युगेंद्र पवार म्हणाले.

बारामतीत शरद पवार गटाकडून कोण निवडणूक लढणार, असा सवाल केला असता ते म्हणाले, बारामतीत कोण निवडणूक लढवणार हे ज्यावेळी आम्हाला महाविकास आघाडीमध्ये जागा सुटेल तेव्हा कळेल. सध्या उमेदवार निश्चित झालेला नाही त्यामुळे मी यावर बोलणार नाही. असं ते म्हणाले.

जय पवार यांच्या सोबत अद्याप माझं बोलणं झालं नाही. पण, तो निवडणूक लढवणार असेल तर शुभेच्छा आहेत, असंही युगेंद्र पवार म्हणाले.

राऊतांची टीका काय?
महाविकास आघाडीचा आज मुंबईत निर्धार मेळावा पार पडला. या मेळाव्यात बोलतांना राऊत म्हणाले की, सुप्रिया सुळे या महाराष्ट्राची लाडकी बहीण आहेत. या बहीणीसाठी महाराष्ट्र लढला. बारामती लढली. पण त्यांच्या लाडक्या भावांनी रंग बदलला. आता ते पिंक झालेत. सरडा रंग बदलतो पण अचानक गुलाबी कसा होऊ शकतो? आता हा पिंक सरडा बारामती सोडणार आहे, पण ते कुठं जाणार हे माहिती नाही. पण एक सांगतो, गुलाबी रंग महाराष्ट्रासाठी धार्जीण नाही. आपला रंग भगवाच आहे, असं राऊत म्हणाले.

 

follow us