Download App

भाजप पदाधिकाऱ्याकडून महिलेला शिवीगाळ, अंधारेंकडून व्हिडिओ ट्वीट, म्हणाले, संस्कार बघा भाजपचे…’

संस्कार बघा भाजपाचे.. कष्टकरी मायमाऊली कार्यालयात झाडलोटीचा पगार मागण्यासाठी गेली असता जयंत आव्हाडने त्या तरुणीस अश्लील शिवीगाळ केली.

  • Written By: Last Updated:

Sushma Andhare : पंतप्रधान नरेंद्र मोदींन (Narendra Modi) जानेवारी 2024 मध्ये नाशिकमधील युवा महोत्ववाला संबोधित करतांना तरुणांनी मद्यपानापासून दुरू राहावं तसेच आई-बहिणींवरून अपशब्द वापरणं बंद करा, असं आवाहन केलं होतं. मात्र, आता एक भाजप पदाधिकारीच एका महिलेला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत असल्याचा व्हिडिओ समोर आला. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी हा व्हिडिओ शेअर करत भाजपवर (BJP) टीका केली.

Akshay Kumar च्या ‘सरफिरा’ चं दुसरं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला; राधिका मदानसह अक्षयचा रोमॅंटीक अंदाज 

संस्कार बघा भाजपचे असं म्हणत अंधारे यांनी हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला. हा व्हिडिओ नाशिक जिल्ह्यातील सिन्नरचे भाजप प्रभारी जयंत आव्हाडांचा आहे. यात आव्हाड हे एका महिलेला शिवीगाळ करताना दिसत आहे. तर व्हिडिओतील एक महिला आईवरून शिव्या देऊ नका, असं सांगत आहे.

अंधारे यांनी लिहिलं की, संस्कार बघा भाजपाचे .. कष्टकरी मायमाऊली कार्यालयात झाडलोट, फरशी कामाचा दीड महिन्याचा पगार मागण्यासाठी गेली असता सिन्नरचा भाजप प्रभारी जयंत आव्हाडने त्या तरुणीस अश्लील व अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली., असं सांगतानाच या महिलेची 354नुसार विनयभंगाची तक्रारही पोलीस स्टेशनने घेतलेली नाही, असं अधारें यांनी लिहिलं.

शिवीगाळीचा हा व्हिडिओ व्हायरल होत असल्याने भापजवर  विरोधक टीकेची झोड उठवण्याची शक्यता आहे. दरम्यान, अंंधारे यांनी शेअर केलेल्या व्हिडिओवर भाजपकडून काय प्रतिक्रिया येते, हेच पाहणं महत्वाचं आहे.

follow us

वेब स्टोरीज