Download App

भाजपसाठी उद्धव ठाकरेंचं सर्वात मोठं आव्हान, त्यांचं नाव घेतल्याशिवाय…; अमित शाहांच्या टीकेला अधारेंचं प्रत्युत्तर

अमित शाहांना आपले भाषण चुरचुरीत करण्यासाठी उद्धव ठाकरेंचं नाव घ्यावं लागतं. त्याशिवाय त्यांना भाषणाची सुरूवात करता येत नाही - सुषमा अंधारे

  • Written By: Last Updated:

Sushma Andhare On Amit Shah: स्वत:ला बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे वारसदार म्हणवून घेणारे आता औरंगजेब (Aurangzeb) फॅन क्लबचे नेते झाले आहेत, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) केली. त्या टीकेला आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी (Sushma Andhare) जोरदार प्रत्युत्तर दिलं.

तुमची लोकसभेची सूज विधानसभेला उतरवू, रुपाली चाकणकरांची खासदार कोल्हेंवर टीका 

 

सुषमा अंधारेंनी एक्सवर एक व्हिडिओ ट्वीट केला. त्यात बोलतांना त्यांनी शाह यांच्यावर जोरदार टीका केली. अंधारे म्हणाल्या की, अमित शाह यांनी आज पुण्यात येऊन जी मुक्ताफळं उधळली आहेत, त्यावरून हे स्पष्ट झाले आहे की, महाराष्ट्रात आल्यानंतर अमित शाहांना आपले भाषण चुरचुरीत करण्यासाठी उद्धव ठाकरेंचं नाव घ्यावं लागतं. त्याशिवाय त्यांना भाषणाची सुरूवात करता येत नाही आणि भाषण संपवताही येत नाही, असं प्रत्युत्तर सुषमा अंधारेंनी दिलं.

अमित शहांचे ‘चॅलेंज’; पवारांना घेरण्यासाठी मोहोळांनीही हात उंचावून थोपटले दंड 

तसंच अमित शहांनी उद्धव ठाकरेंवर ज्या पद्धतीने टीका केली आहे, त्यावरून महाराष्ट्रात भाजपसाठी उद्धव ठाकरे हेच सर्वात मोठं आव्हान असल्याचं स्पष्ट होतंय, असंही अंधारे म्हणाल्या.

अमित शाह यांनी आपल्या भाषणात अतिशय थिल्लर भाषा वापरली आहे. हे दुर्दैवी आहे. भाजप खासदार रमेश भिदूडी यांनी संसदेत जी सवंग भाषा वापरली होती, त्यापेक्षाही खालचा स्तर अमित शाहांनी गाठल्याची टीका अंधारेंनी केली.

तर ज्यांनी जिनांच्या कबरीवर जाऊन फुलं वाहिली आणि ज्यांनी निमंत्रण नसतांना नवाज शरीफ यांच्या वाढदिवसाला जात केक भरवला ते कोणत्या फॅन क्लबचे सदस्य आहेत? याचं उत्तर अमित शाहांनी द्यावं, अशी टीका अंबादास दानवेंनी केली.

https://www.youtube.com/watch?v=PZMv_d0e7RU

शाह काय म्हणाले?
पुण्यातील सभेत बोलतांना शाह म्हणाले की, कसाबला बिर्याणी खाऊ घालणाऱ्या काँग्रेससोबत उद्धव ठाकरे गेले आहेत, याकुब मेननच्या सुटकेची मागणी करणाऱ्यांसोबत ठाकरे बसले, झाकीर नाईकांना शांततादूत बनवणाऱ्यांच्या मांडीवर ते बसलेत. स्वत:ला बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार म्हणवून घेणारे उद्धव ठाकरे आता औरंगजेब फॅन क्लबचे नेते झाले आहेत, अशी टीका शाह यांनी केली.

follow us