Uddhav Thackeray : उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) अर्थसंकल्पीय अधिवेशात मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेची घोषणा केली. या योजनेवरून विरोधकांनी सरकावर जोरदार टीका केली. आता ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) या योजनेवरून सरकारवर टीकास्त्र डागलं.पापाचा घडा लपवण्यासाठी सरकारवर त्यावर योजनाचं पांघरून घालतेय, अशी टीका त्यांनी केली.
मराठ्यांचं वादळ पश्चिम महाराष्ट्रात येणार, जरांगेंनी बोलावली महत्वाची बैठक
योजनांची अतिवृष्टी पण…
उद्धव ठाकरे हे आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यानिमित्त शिवसंकल्प मेळाव्याला उद्धव ठाकरेंनी संबोधित केलं. या मेळाव्यात त्यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. लाडकी बहिण योजनेवरूनही त्यांनी सरकारवर टीका केली. ते म्हणाले की, अवघ्या तीन महिन्यांवर विधानसभा निवडणुका आल्यात. सरकारने अनेक योजना मांडल्या आहेत. माता-भगिनींना आकर्षित करण्यासाठी डाव टाकला आहे. मात्र गेल्या दहा वर्षांपासून मोदी सरकार सत्तेवर आहे. दहा वर्षांत तुम्ही किती योजना अंमलात आणल्या, हे सांगा. योजनांची अतिवृष्टी पण, अंमलबजावणीचा दुष्काळ, असा टोला त्यांनी लगावला.
Maharashtra Assembly Election : मविआचं जागा वाटप कसं होणार? पवारांनी सांगितला डिटेल फॉर्म्युला
पापचा घडा लपवण्यासाठी योजनाचं पांघरून
ठाकरे म्हणाले, सरकारने शेतकऱ्यांची वीजमाफीची घोषणा केली. मात्र वीज माफीची घोषणा करताना सरकार वीजबील थकबाकीवर काहीच बोलत नाही. थकबाकी देखील माफ करा, अशी आमची मागणी आहे. मी पहिल्या दिवशी म्हटलं की, हे गळती सरकार आहे. त्यांचं शेवटचं अधिवेशन आहे. योजना खूप मांडल्या जात आहेत. माता-भगिनींना मतदानासाठी आकर्षित करण्यासाठी डाव टाकत आहे. निवडणुकीमध्ये निवडणुक येण्यासाठी आपल्या पापाचा घडा लपवण्यासाठी सरकारवर त्यावर योजनाचं पांघरून घालत आहे, अशी टीका ठाकरेंनी केली.
गद्दारींनी चोरून विजय मिळवला...
पुढं बोलतांना ते म्हणाले, हा गद्दारांनी चोरून विजय मिळवला. शिवसेना चोरली, धनुष्यबाण चोरलं. अरे चोरट्यांनो, भामट्यांनो, तुमचा विजय हा खरा विजय नाही. अनेकांनी मला सांगितलं की, आम्ही धनुष्यबाणाच्या चिन्हाला मतं दिली. कारण, मशाल लोकांपर्यंत उशीरा पोहोचली. आता मशालीच्य माध्यमांतून यांची पापं आपल्याला जाळायची आहे,असंही ठाकरेंनी म्हटलं.