Uddhav Thackeray : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. एकनाथ शिंदे हे नुकतेच महाकुंभ मेळ्यासाठी प्रयागराजला जाऊन आले, त्यावरून ठाकरेंनी त्यांच्यावर जोरदार टीका केली. इकडे पन्नास खोके घेतले आणि तिकडे डुबकी मारायची, याला काय अर्थ? तुम्ही कितीही डुबक्या मारा, गद्दारीचा शिक्का पुसल्या जाणार नाही, असा घणाघात ठाकरेंनी केला.
एम डी फाउंडेशनकडून वृक्ष लागवड आणि रक्तदान शिबिर; 30 वर्षांपासूनची परंपरा कायम
तसंच हिंदुत्व सोडून देण्याची काहीजण आपल्यावर टीका करतात. सोडून दिले म्हणता, हिंदुत्व म्हणजे काय धोतर आहे का? असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.
हिंदुत्व म्हणजे काय धोतर नाही…
ठाकरे गटाच्या वतीने आयोजित मराठी भाषा दिनानिमित्तच्या कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, अनेक शिवसेना नेते, खासदार, आमदार उपस्थित होते. यावेळी बोलताना ठाकरेंनी जमलेल्या माझ्या तमाम मराठी बंधुंनो आणि मातांनो म्हणत भाषणाला सुरूवात केली. ते म्हणाले, आता उद्या पेपरला येईल की उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडलं. पण, हिंदुत्व म्हणजे काही धोतर नाही. सोडून दिलं म्हणायला. शिवसेना प्रमुखांनी एक घोष वाक्य दिलं – गर्व से कहो हम हिंदू आहे. त्यासोबतच अभिमानाने म्हणा मी मराठी आहे, असंही ते म्हणाले. हमे मराठी नही आती, असं म्हणणाऱ्यांच्या कानाखाली वाजलली पाहिजे, तर आपण मराठी. दिल्लीचे तख्त राखतो महाराष्ट्र माझा, अशी गाणी ऐकून नुसती वाहवा नको, तर तसं वागा. तसं वागलो तरच मराठीला अभिमान वाटेल, असं ठाकरे म्हणाले.
गद्दारीचा शिक्का तसाच राहणार कितीही डुबक्या मारा
यावेळी ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवरही निशाणा साधला. ते म्हणाले, इकडे ५० खोके घेतले आणि तिकडे डुबकी मारून आलो, उपयोग काय त्याचा? इकडे महाराष्ट्राी गद्दारी करायची आणि तिकडे डुबकी मारायची म्हणजे कुणांचं पाप नाही धुतल्या जातं? गद्दारीचा शिक्का तसाच राहणार आहे. तुम्ही कितीही डुबक्या मारा, असं म्हणत ठाकरेंनी शिंदेंवर नाव न घेता टीका केली.
पुढे बोलताना ते म्हणाले की, परवा दिल्लीत साहित्य संमेलन झालं, कसलं संमलेन झालं, माहिती नाही. विशेष म्हणजे अध्यक्ष असलेल्या ताराताई भवाळकरांनी जे विचार मांडले, त्यावर चर्चा झाली पाहिजे होती. दिशा दाखवणारं त्यांचं भाषण होतं. मी जैविक नाही म्हणणाऱ्यांवर प्रहार करणार ते भाषण होतं, अस ठाकरे म्हणाले.