एम डी फाउंडेशनकडून वृक्ष लागवड आणि रक्तदान शिबिर; 30 वर्षांपासूनची परंपरा कायम

एम डी फाउंडेशनकडून वृक्ष लागवड आणि रक्तदान शिबिर; 30 वर्षांपासूनची परंपरा कायम

blood donation and Tree planting on Rasiklal Ma. Dhariwal’s birthday : दरवर्षी 1 मार्च रोजी श्री रसिकलाल मा. धारीवाल यांच्या जन्मदिनानिमित्त “रक्तदान सोहळा” आयोजित केला जातो या आधीही त्यांच्या जन्मदिनानिमित्त पुण्यामध्ये विविध रक्तदान केंद्रांवर एकाच दिवशी २४,000 ब्लड बॅग्स संकलन करण्याचा विक्रम आर एम डी फाउंडेशनने केलेला आहे, हि परंपरा आजही नियमितपणे पाळल्या जाते.

स्वारगेट अत्याचार प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, रहाटकरांचे पोलीस महासंचालकांना पत्र, ‘येत्या 3 दिवसात…’

तसेच आर एम डी फाउंडेशन द्वारा मागील 30 वर्षांपासून वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन कार्यक्रम निरंतर चालू आहे श्री रसिकलाल धारीवाल साहेब यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त “एक लाख झाडं लावण्याची योजना” असेल किंवा “पुलकछाया योजने” अंतर्गत भारतभर वृक्ष लागवड असेल किंवा “एक झाड आईच्या नावाने” योजना असेल तेव्हा आर एम डी फाउंडेशनद्वारा शेकडो वृक्ष लागवड व संवर्धन कार्यक्रम राबविण्यात आलेले आहे. आज काळाच्या बदलत्या गरजेनुसार फाउंडेशनने “ट्री ट्रान्सप्लांटेशन योजना” राबविण्यात सुरुवात केलेली असून पुणे रिंग रोड प्रकल्पात शेकडो वृक्षांना कापण्यापासून वाचवून उपलब्ध जागेत स्थानांतर करून अनेक वृक्षांचे प्राण वाचविण्याचे काम सुरु झालेले आहे.

फुले शाहू आंबेडकरी जनता मटण, दारू आणि पैशाने विकली; प्रकाश आंबेडकर असं का म्हणाले?

आजच्या प्रसंगी ” वृक्ष लागवड आणि रक्तदान वाचवी मानवाचे प्राण” अशी भावना शोभाताई रसिकलाल धारिवाल यांनी व्यक्त केली. दिनांक १ मार्च २०२५ शनिवार रोजी श्री रसिकलाल साहेबांच्या जन्मदिनानिमित्त जास्तीत जास्त पुणेकरांनी आर एम डी बंगला नंबर ६४, लेन नंबर ३ कोरेगाव पार्क-पुणे येथे उपस्थित राहून रक्तदान करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. अधिक माहितीसाठी ७३५३३५४४४४ या क्रमांकावर संपर्क साधावा.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube