ठाकरे आहात तर ठाकऱ्यांसारखे वागा, दिल्लीचे बूट चाटू नका, राऊतांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल

ठाकरे आहात तर ठाकऱ्यांसारखे वागा, दिल्लीचे बूट चाटू नका. महाराष्ट्र दुश्मन फडणवीसांची पालखी वाहू नका - संजय राऊत

Sanjay Raut

Sanjay Raut

Sanjay Raut : विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Elction) पार्श्वभूमीवर राजकीय नेते सातत्याने एकमेकांवर टीका करत आहेत. आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकर (Raj Thackeray) यांच्यावर हल्लाबोल केला आहे. ठाकरे आहात तर ठाकऱ्यांसारखे वागा, दिल्लीचे बूट चाटू नका. महाराष्ट्र दुश्मन फडणवीसांची पालखी वाहू नका, अशी टीका राऊतांनी केली.

प्रतिभा पवारांना बारामती टेक्सस्टाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलं, गेटवरच अडवली गाडी… 

आम्हाला ईडीने अटक केली होती, आम्ही XX सारखे वागलो नाही, ईडीने तुम्हाला एकदा फोन केला तर तुम्ही दोन वर्षे कोमात गेला आणि आता भाजपची सुपारी घेत आहात, असंही राऊत म्हणाले.

विक्रोळी विधानसभा मतदारसंघातील ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊत यांच्या प्रचारार्थ संजय राऊत यांनी सभा घेतली. यावेळी राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह भाजपवर हल्लाबोल केला. राज ठाकरे विक्रोळीत दोन वेळा येऊन गेले.
देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशावरून राज ठाकरे सुनील राऊत यांच्या विरोधात सभा घेत आहेत. शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचे बूट राज ठाकरे चाटत आहेत, असं घणाघात राऊतांनी केला.

राज ठाकरे, नरेंद्र मोदी आणि अमित शाहांना स्वप्नात मीच दिसतो. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांना माझ्या नावाने झोप लागत नाही, ही निष्ठावंतांची ताकद आहे, असंही राऊत म्हणाले.

शिवाजीराव कर्डिले यांच्या प्रचारार्थ पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राहुरी तालुक्यात झंझावाती दौरा 

संजय राऊत म्हणाले, राज ठाकरेंनी त्यांच्या सभेत माझ्यासाठी रिकामी खुर्ची ठेवली. मग आता आपल्या सभेत त्यांच्यासाठी खाट ठेवूया. कारण, 23 तारखेला आपण त्यांची खाट टाकणारच आहतो. आम्ही बाळासाहेबांचे कडवट निष्ठावंत आहे. आम्ही आमची निष्ठा आणि इमान विकले नाही. ईडीने आम्हाला ताब्यात घेतले तेव्हा आम्ही घाबरलो नाही. ईडीने तुम्हाला एकदा फोन केला तर तुम्ही दोन वर्षे कोमात गेलात, असा टोलाही राऊतांनी लगावला.

इथे भिकारडा संपादक राहतो, अशी टीका राज ठाकरेंनी केली होती. त्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, नरेंद्र मोदींनी महाराष्ट्राला भिकारी बनवले आहे. त्या मोदींचे पाय आपण चाटत आहात. बाळासाहेब ठाकरेंनी नियुक्त केलेल्या संपादकाला तुम्ही भिकारी म्हणता, हेच तुमचे बाळासाहेबांवरील प्रेम आहे का? तुम्ही ठाकरे आहात तर ठाकरेंसारखे वागा, असं राऊत म्हणाले.

Exit mobile version