Download App

Uday Samant : ‘शरद पवार गटाला नवा ज्योतिषी मिळाला’; आव्हाडांच्या वक्तव्यावर सामंतांचा खोचक टोला

Uday Samant: नागपूरमधील हिवाळी अधिवेशन (Winter Session 2023) संपल्यानंतर महायुती आणि महाविकास (Uday Samant) आघाडीच्या नेत्यांना लोकसभा निवडणुकांचे वेध लागले आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी मोठा गौप्यस्फोट केला. नागपूरमध्ये भाजप-आरएसएस यांची एक वैचारिक बैठक झाली आणि त्या बैठकीत भाजपने स्वतंत्र निवडणूक लढवण्याचे फायनल झाले आहे. ज्यांना भाजपसोबत निवडणूक लढवायची आहे त्यांनी कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवावी असे ठरले आहे, असे आव्हाड यांनी सांगितले होते. त्यांच्या या वक्तव्याचे पडसाद उमटत असून सत्ताधारी गटातील नेत्यांनी आव्हाड यांच्यावर सडकून टीका केली आहे.

राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि शिंदे गटातील नेते उदय सामंत यांनी आव्हाड यांचा चांगलाच समाचार घेतला. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात एक ज्योतिषी आहेत. आता राष्ट्रवादीच्या शरद पवार गटालाली एक ज्योतिषी मिळाला. ते ज्योतिषी जे बोलले तसे काही होणार नाही. शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी एकत्रच निवडणुका लढणार आहोत. त्यांच्या पक्षाचे अस्तित्व राहिले नाही म्हणून आता ते अशी विधाने करत आहेत. आव्हाड सातत्याने खोडसाळ वक्तव्ये करत असतात त्यामुळे त्यांच्यावर आता कुणाचाही विश्वास नाही, असे सामंत म्हणाले.

पवारांना धक्का, शिवसेनेला टेन्शन : माजी आमदार सुरेश लाड यांचा भाजपमध्ये प्रवेश

भाजप आमदार आशिष शेलार यांनीही आव्हाडांना प्रत्युत्तर दिले. आव्हाड यांनी आधी स्वतःच्या पक्षाची काळजी करावी. तुमचा पक्ष कोणता, तुमच्या पक्षाचे नाव काय, पक्षाचा नेता कोण, निवडणूक चिन्ह कोण, निवडणुकीत स्वबळावर लढणार की दुसऱ्या पक्षांची काठी सोबत घेऊन चालणार, तुमच्या पाठी चार आमदार तरी आहेत का, असे सवाल शेलार यांनी उपस्थित केले. तसेच आमदार प्रसाद लाड यांनीही आव्हाडांवर पलटवार केला.  आव्हाड यांनी त्यांच्या फुटलेल्या पक्षाला सांभाळावे. त्यांच्याबरोबर  आता 12 आमदार तरी राहिले आहेत का असा सवाल करत भाजप संघाने काय करावे हे शिकण्याची गरज आम्हाला आव्हाडांकडून नाही, असे लाड म्हणाले.

काय म्हणाले होते आव्हाड ?

जितेंद्र आव्हाड यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले होते की नागपूरमधील हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर धक्कादायक राजकीय चर्चा सुरू झाली आहे. नागपूरमध्ये भाजप-आरएसएस यांची एक वैचारिक बैठक झाली. त्यामध्ये तीन राज्यातील निवडणुका जिंकल्यानंतर महाराष्ट्रात काय असू शकते, यावर मंथन झाले. या मंथनातून राज्यात भाजपने एकट्याने निवडणूक लढवावी, असे ठरवण्यात आले.

Uday Samant : ठाकरेंचं चॅलेंज सामंतांनी स्वीकारलं! म्हणाले, शिंदेच कशाला आम्ही 50 आमदार..

Tags

follow us