पवारांना धक्का, शिवसेनेला टेन्शन : माजी आमदार सुरेश लाड यांचा भाजपमध्ये प्रवेश

पवारांना धक्का, शिवसेनेला टेन्शन : माजी आमदार सुरेश लाड यांचा भाजपमध्ये प्रवेश

मुंबई : राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे नेते आणि कर्जत-खालापूरचे माजी आमदार सुरेश लाड (Suresh Lad) यांनी भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित त्यांच्या पक्षप्रवेशाचाा कार्यक्रम पार पडला. शरद पवार गटाच्या मर्यादा आणि अजित पवार गटाचे नेते, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे यांचे मतदारसंघात वाढलेले प्रस्थ यामुळे ते नाराज असल्याचे बोलले जात होते. (NCP (Sharad Pawar) group leader and former Karjat-Khalapur MLA Suresh Lad has joined the BJP)

कर्जत खालापूर मतदारसंघातून सुरेश लाड राष्ट्रवादीच्या तिकीटावरुन सुरेश लाड विधानसभेवर निवडून गेले होते. मात्र गेल्या निवडणुकीत त्यांचा शिवसेनेच्या महेंद्र थोरवे यांच्याकडून पराभव झाला होता, तेव्हापासून ते काहीसे अज्ञातवासात गेले होते. याच कालावधीत राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे, मंत्री अदिती तटकरे आणि आमदार अनिकेत तटकरे यांनी सुधाकर घारे यांना ताकद देण्यास सुरुवात केली. त्यांना जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपद देऊन त्यांना राजकीय आणि आर्थिक पाठबळ दिले जात होते.

मलिक, भाजपचा गेम प्लॅन अन् अजितदादा गटाला शंका; पवारांना घटस्फोट देण्याची भाजपची पूर्वतयारी ?

त्यामुळे लाड नाराज असल्याचे बोलले जात होते. त्यानंतर खासदार सुनील तटकरे यांनी त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न केले, पण त्याची नाराजी काही दूर होऊ शकली नाही. नंतर तटकरेंनीही त्यांची समजूत काढणे सोडून दिले. तिथपासूनच ते भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सतत सुरू होत्या. पण त्यांनी पक्षप्रवेश केला नव्हता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंडानंतर, त्यांनी शरद पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला होता. मात्र जिल्ह्यात अजित पवार गटाची वाढणारी ताकद आणि शरद पवार गटाच्या मर्यादा यामुळे त्यांनी अखेर आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला.

बृजभूषण यांचा ‘डाव’ यशस्वी; कुस्ती महासंघाचे नवे ‘पहिलवान’ संजय सिंह आहेत तरी कोण ?

दरम्यान, आता कर्जत-खालापूर विधानसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत. गत विधानसभा निवडणुकीपूर्वी, शिवसेनेचे माजी आमदार देवेंद्र साटम भाजपमध्ये दाखल झाले होते. आता सुरेश लाडही भाजपमध्ये आल्याने मतदारसंघातील भाजपची ताकद वाढणार आहे. मतदारसंघातील भाजपचे वाढते प्रस्थ हे शिवसेनेसाठी अडचणीचे असणार आहे. शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांच्यासाठी ही धोक्याची घंटा ठरू शकते. तर घारे यांच्यासाठी तटकरेही जोर लावणार असल्याचे स्पष्ट आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube