Uday Samant : ठाकरेंचं चॅलेंज सामंतांनी स्वीकारलं! म्हणाले, शिंदेच कशाला आम्ही 50 आमदार..

Uday Samant : ठाकरेंचं चॅलेंज सामंतांनी स्वीकारलं! म्हणाले, शिंदेच कशाला आम्ही 50 आमदार..

Uday Samant replies Aditya Thackeray : राज्यात आता निवडणुकांचे वारे जोरात वाहू लागले आहेत. मतदारसंघांच्या चाचपणीबरोबरच दबावाचं राजकारण सुरू झालं आहे. ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एकतर मला ठाण्यात बोलावून निवडणूक लढवावी किंवा त्यांनी वरळीत येऊन निवडणूक लढवावी, असे आव्हान दिले. त्यांच्या या आव्हानाला आज राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. एकनाथ शिंदेच काय आम्ही 50 आमदारांपैकी कुणीही त्यांचं स्वीकारू शकतो त्यात मी सुद्धा आहे, अशा शब्दांत आदित्य ठाकरेंचं चॅलेंज स्वीकारलं.

सामंत पुढे म्हणाले, एकनाथ शिंदे राज्यातील 288 मतदारसंघात कुठूनही निवडून येऊ शकतात. एवढी त्यांची ताकद आहे. एवढी त्यांनी विकासकामं केलेली नाहीत. त्यांनी कधीही घरात बसून लोकांशी संपर्क साधलेला नाही. थेट लोकांपर्यंत जाऊन ते चर्चा करतात. त्यामुळे शिंदे साहेबांना आव्हान देण्यापेक्षा मी सांगतो आमच्या 50 आमदारांपैकी कुणीही आव्हान स्वीकारू शकतो तसेच शिंदे साहेब 288 मतदारसंघातून कुठूनही निवडून येऊ शकतात, असे उत्तर मंत्री सामंत यांनी दिलं.

Uday Samant : माझ्या भावाने मशालीचे स्टेटस ठेवले; भावाच्या ठाकरे गटाच्या प्रवेशावर सामंत म्हणाले.. 

तुमचा महानगरप्रमुख सलीम कुत्ताला बुके देतोय.. 

मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीबरोबर ठाकरे गटाचे नेते डान्स करतात ही महाराष्ट्राची शोकांतिका आहे. ज्या लोकांनी देशाच्या अस्मितेवर मुंबईवर हल्ला केला. जी लोकं पॅरोलवर बाहेर आहेत आणि दुसऱ्या दिवशी पु्न्हा तुरुंगात जाणार आहेत म्हणून त्यांच्यासाठी पार्टी ठेवली जाते आणि त्या पार्टीत नाचलं जातं. हे राज्याचं दुर्दैव आहे. याचं उत्तर ही लोकं का देत नाहीत. फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करायची एवढाच फक्त या लोकांचा उद्योग आहे. तुमचा जो महानगरप्रमुख आहे तो सलीम कुत्ताला बुके देतोय, त्याच्याबरोबर नाचतोय याचं उत्तर द्या, असे आव्हान सामंत यांनी ठाकरे गटाला दिले.

विरोधकांकडून सल्ले घेण्याची आम्हाला गरज नाही

मनोज जरांगेंची मागणी काय होती तर निजामकालीन नोंदींप्रमाणे कुणबी दाखले द्यावेत. हे काम शिंदे समिती मोठ्या प्रमाणात करत आहे. इम्पिरिकल डेटा करून टिकणारं आरक्षण दिलं पाहिजे तर ते देखील आपण करतोय. मराठा समाजाला आरक्षण देत असताना ओबीसी आरक्षण कुठेही कमी केलं जाणार नाही हीच आमची भूमिका आहे. त्यामुळे विरोधकांना विचारून आम्हाला सल्ले घेण्याची गरज नाही.

Aditya Thackeray : ठाकरेंचं मिशन कोकण! ‘खळा’ बैठकांतून साधणार निवडणुकांचे लक्ष्य?

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube