Uday Samant Speak On Narhari Zirwal : राज्यातील सत्तासंघर्षांवर सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आहे. आमदारांच्या अपात्रतेबाबतचा निर्णय हा विधानसभा अध्यक्षांना देण्यात आला आहे. यावर विरोधकांकडून टीका टिप्पणी केली जात आहे. यातच माझ्याकडे हा निर्णय आला तर मी त्यांना अपात्र करेल असे वक्तव्य विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी केले. मात्र त्यांना हा अधिकार कोणी दिला? असा सवाल मंत्री उदय सामंत यांनी केला.
आमदारांच्या पात्र व अपात्रतेबाबतचा निर्णय या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन निर्णय घेतला जाईल अशी प्रतिक्रिया विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेली आहे. मात्र विरोधात निकाल गेला की विरोधकांकडून आरोप – प्रत्यारोप केले जातात. निकाल आमच्याच बाजूने असल्याचे भासवले जाते. यामुळे यांचा खोटारडेपणा जनतेसमोर उघड झाला आहे.
लोकशाहीतील ज्या काही मोठ्या संस्था आहे त्यांची जाणीवपूर्वक बदनामी करणे हा काही लोकांचा धंदा झाला आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयावर देखील यांनी आक्षेप घेतला. निकाल आमच्या बाजूने लागेल असा विश्वास त्यांना होता. मात्र निकाल विरोधात गेल्याने काही लोकांकडून निवडणूक आयोगाची बदनामी करण्याचे षड्यंत्र आखले गेले. असे सामंत यांनी उद्धव ठाकरे गटाचे नाव न घेता त्यांना टोला लगावला आहे.
जे चांगले काम करत आहे त्यांना बदनाम करायचे व ते निर्णय चुकीचे आहे हे जनतेला पटवून द्यायचे हा दररोज सकाळचा साडेनऊचा उद्योग काही जण करतायत. सातत्याने सरकार बेकायदेशीर आहे त्यांच्याविरोधात पोलिसांनी तसेच अधिकाऱ्यांनी बंड करावे असे अधिकाऱ्यांना सांगितले जात आहे. अशा पद्धतीने वक्तव्य करणे हा आतंकवाद आहे.
Ahmednagar Crime : शेवगावमध्ये दंगल घडविणाऱ्यांची धरपकड !
ज्यांनी लोकांमध्ये गैरसमज निर्माण करून निवडणुका जिंकल्या. जे दंगली घडवून निवडणुका जिंकल्या. त्यांनी आम्हाला नैतिकतेचे धडे शिकवू नये. आधी तुम्ही स्वतःची नैतिकता सिद्ध करा. तुमचे मंत्र्यांचा संबंध दाऊदशी होता मात्र त्यांचे राजीनामे तुम्ही घेतले नाही. त्यांचा राजीनामा घ्यावा ही तुम्ही नैतिकता होती पण तुम्ही तसे केले नाही.
महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबत अजित पवारांचे मोठे विधान
विधानसभा व लोकसभा निवडणुका सोबत होणार का?
राज्यात आगामी विधानसभा व लोकसभा निवडणूक या सोबत होतील असा अंदाज विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी वर्तवला होता. यावर आता शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सामंत म्हणाले, मला जेवढं राजकारण समजत त्यानुसार माझा असा अंदाज आहे की या दोन्ही निवडणुका सोबत होणार नाही.