Ahmednagar Crime : शेवगावमध्ये दंगल घडविणाऱ्यांची धरपकड !
छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त शेवगाव शहरात काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्यान दगडफेक झाली. त्यात पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. रविवारी रात्री ही घटना घडली होती. त्यानंतर पोलिसांनी गुन्हे दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे. दंगलीचे व्हिडिओही समोर आले आहेत. या व्हिडिओची मदत घेऊन पोलिस आरोपींची धरपकड करत आहे.
महाराष्ट्रातील दंगलीच्या घटना हा BJP चा निवडणूक प्लॅन; ठाकरे गटाच्या नेत्याचा मोठा आरोप
दोन गटात एकमेकांवर दगड फिरकवल्याने अनेक जण जखमी झाले. तर परिसरातील काही दुकांच्या काचा फुटल्या. तसेच घटनास्थळी असलेल्या चारचाकी व दुचाकी वाहनांचेही मोठे नुकसान झाले. दगडफेकीच्या घटनेनंतर शेवगाव शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
Akola Riots : काही लोक आगीत तेल ओततात, सगळं बाहेर आणणार; अकोला दंगलीवरून फडणवीसांचा निशाणा
याप्रकरणी शेवगाव पोलिस ठाण्यात 112 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. 32 जणांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आलेली आहे.
पोलिसांकडून ताब्यातील व्यक्तींची सहभागाबद्दल पडताळणी केली जात आहे. परिस्थितीवर उपविभागिय पोलिस अधिकारी संदीप मिटके, पोलीस निरीक्षक विलास पुजारी लक्ष ठेवून आहेत. दगडफेकीच्या घटनेदरम्यान घटनास्थळावरून मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या घटनेतील दोषींची पडताळणी केली जात आहे. शेवगाव शहरात सध्या शांतता असून, चारशे पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहेत.