Download App

…तर मीही उद्धव आणि आदित्य ठाकरेंच्या प्रेसला जाणार अन् प्रश्न विचारणार

  • Written By: Last Updated:

Nitesh Rane on Sanjay Raut : कोणालाही कुठल्याही पत्रकार परिषदेत जाऊन बसण्याचा आणि प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. तसा मलाही अधिकार आहे. मी एका वृत्तपत्राचा संचालक आहे. उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेला जाऊन प्रश्न विचारण्याचा अधिकार मला देखील आहे. मग त्यांनी थयथयाट करायचा नाही, असा हल्लाबोल भाजप आमदार नितेश राणे यांनी केला.

संजय राऊत म्हणाले की मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत मी पत्रकार म्हणून जाऊन बसणार आणि प्रश्न विचारणार. आमच्याकडे पण वृत्तपत्र आहे. मी पण आमच्या संपादकाला घेऊन उद्धव ठाकरेंच्या प्रेसला जाणार, आदित्य ठाकरेंच्या प्रेसला जाऊन बसणार आणि प्रश्न विचारणार. तुम्ही महाविकास आघाडीच्या काळात सत्तेवर असताना भ्रष्टाचार का केला? हे विचारणार, असा इशारा नितेश राणे यांनी दिला.

ते पुढं म्हणाले की आत्ता आदित्य ठाकरेंना शेतकरी आठवतात. सत्ता असताना डिनो मोर्या खांद्यावर आणि विरोधात असताना शेतकऱ्यांच्या बांधावर अशी आदित्य ठाकरेंची अवस्था आहे.

चीनची अर्थव्यवस्था डबघाईला! परदेशी गुंतवणूकदारांनी 188 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक काढली

राज्य सरकारची मराठवाड्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथे कॅबिनेट झाली आहे. मराठवाड्याला भरभरून देण्याचं काम आमच्या सरकारने केले. तसंच मंत्रिमंडळात कोकणातले देखील मंत्री आहेत. मराठवाड्याप्रमाणे कोकणात ही कॅबिनेट व्हावी. यासाठी मी सरकारला पत्र लिहिणार आहे, असे नितेश राणे यांनी सांगितले.

पाकिस्तानचे नापाक कृत्य, घुसखोरीचा प्रयत्न करणारे तीन दहशतवादी ठार

राज्यात महायुतीचे सरकार आल्यापासून विकाम कामांची घोडदौड सुरु आहे. ह्या सगळ्या गोष्टीला पणवती लावण्याच काम उबाठा सेना करत आहे. चांगल्याला चांगलं म्हणणे हा माणुसकीचा धर्म आहे. राज्यात काही चांगले झाले की काळ्या मांजरीसारखे आडवे येणं हे संजय राऊत आणि उबाठ्याचे नेते करत आहेत. मराठवाड्यात बैठक झाल्याने हॉटेल व्यावसायिकांच भल होत आहे हे ह्यांना बघवत नाही, अशी टीका नितेश राणे यांनी केली.

Rohit Pawar on Nitesh Rane | राणेंचा खोचक टोला, पवारांनी खडेबोल सुनावले | LetsUpp Marathi

Tags

follow us