पाकिस्तानचे नापाक कृत्य, घुसखोरीचा प्रयत्न करणारे तीन दहशतवादी ठार

पाकिस्तानचे नापाक कृत्य, घुसखोरीचा प्रयत्न करणारे तीन दहशतवादी ठार

Baramulla Encounter : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात सुरक्षा दलांची कारवाई सुरू आहे. दरम्यान, बारामुल्ला जिल्ह्यातील नियंत्रण रेषेजवळ (LOC) आज (शनिवारी) सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले. दहशतवादी घुसखोरीचा प्रयत्न करत होते.

काश्मीर पोलिसांनी सांगितले की, बारामुल्ला जिल्ह्यातील सीमावर्ती भागातील हथलंगा येथील उरी भागात शनिवारी सकाळी चकमक झाली. परिसरात शोधमोहीम सुरू आहे.

भारतीय लष्कर काय म्हणाले?
लष्कराच्या चिनार कॉर्प्सने एका पोस्टमध्ये लिहिले आहे. “भारतीय लष्कर, जम्मू-काश्मीर पोलीस आणि गुप्तचर यंत्रणांनी केलेल्या संयुक्त कारवाईत आज सकाळी बारामुल्लाच्या उरी भागात नियंत्रण रेषेजवळ घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला.

भारतात येणार आणखी चित्ते; PM मोदींच्या बड्डेला घोषणा होण्याची शक्यता

तीन दहशतवाद्यांनी भारतीय सीमेत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात आले, त्यानंतर सज्ज सैनिकांनी त्यांचा मुकाबला केला. लष्कराच्या म्हणण्यानुसार, चकमकीत ठार झालेल्या दोन दहशतवाद्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, मात्र आजूबाजूच्या परिसरात पाकिस्तानी चौकीतून गोळीबार झाल्याने तिसऱ्या दहशतवाद्याचा मृतदेह बाहेर काढण्यात अडचणी येत आहेत.

पोलीस काय म्हणाले?
काश्मीर पोलिसांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सांगितले ‘बारामुल्ला जिल्ह्यातील हातलंगा येथे उरीच्या सीमावर्ती भागात दहशतवादी आणि लष्कर आणि बारामुल्ला पोलिसांच्या जवानांमध्ये चकमक झाली आहे.’ नंतर दिलेल्या माहितीमध्ये चकमकीत तीन दहशतवादी ठार झाल्याचे सांगण्यात आले. पुढील दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी परिसरात सर्च ऑपरेशन सुरू आहे.

जीपीएसची होणार सुट्टी! इस्त्रोची NavIC टेक्नॉलॉजी मिळणार प्रत्येक स्मार्टफोनमध्ये, सरकारचा मोठा निर्णय

अनंतनागमध्येही सर्च ऑपरेशन
जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील घनदाट जंगल परिसरातून दहशतवाद्यांचा खात्मा करण्याची मोहीम शनिवारी चौथ्यांदा सुरू आहे. यासाठी सुरक्षा दलाने ड्रोन आणि हेलिकॉप्टरची मदत घेतली आहे.

दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत लष्कराच्या 19 राष्ट्रीय रायफल्स युनिटचे कमांडिंग ऑफिसर कर्नल मनप्रीत सिंग, मेजर आशिष धोचक, जम्मू-काश्मीरचे पोलीस उपअधीक्षक हुमायून भट्ट आणि आणखी एक लष्करी जवान शहीद झाले आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube