Download App

निवडणूक आयुक्त हे सर्वोच्च न्यायालय अन् राष्ट्रपतींपेक्षा मोठे आहेत का ? उद्धव ठाकरे कडाडले

उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोग आणि सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. निवडणूक आयुक्त सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठे आहेत का, असा सवाल त्यांनी केला.

  • Written By: Last Updated:

Uddhav Thackeray On Election Commissioner : राहुल गांधींनी (Rahul Gandhi) पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये मतचोरी (Vote Chori) झाल्याचा धक्कादायक आरोप केलाय. ठाकरे गटानेही हा मुद्दा उचलून धरला. दरम्यान, आता ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकर (Uddhav Thackeray) यांनी पत्रकार परिषदेत निवडणूक आयोग आणि सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. निवडणूक आयुक्त (Election Commissioner) हे राष्ट्रपती आणि सर्वोच्च न्यायालयापेक्षा (Supreme Court) मोठे आहेत का, असा सवाल त्यांनी केला.

राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांचा रक्षाबंधन कार्यक्रमात सन्मान, काय म्हणाले मुख्यमंत्री? 

निवडणूक आयुक्त राष्ट्रपतींपेक्षा मोठे झाले आहेत का?
पत्रकार परिषदेत बोलताना ठाकरे म्हणाले, बिहारमध्ये मतदान यादीतील वगळलेल्या नावांची यादी सुप्रीम कोर्टाने निडणूक आयोगाल मागितली होती. मात्र, वगळेली नाव देण्याला आम्हाला बंधनकारक नाही, असं निवडणूक सांगत असेल तर हा सर्वोच्च न्यायालयाचा अपमान आहे. सर्वोच्च न्यायालयापेक्षा निवडणूक आयुक्त मोठे आहेत की काय? तसंच व्हीव्हीपॅटवच्या रिसीटची मोजणी कधीच झाली नाही. सिम्बॉलिक मोजणी झाली. आता व्हीव्हीपॅटही काढलं. निवडणूक आयोग एक एक निर्णय आपल्या मर्जाने घेत आहे. निवडणूक आयुक्त राष्ट्रपतींपेक्षा मोठे झाले आहेत का?, असा सवाल ठाकरेंनी केला.

निवडणुक आयोगावर इंडिया आघाडीच्या खासदारांनी मोर्चा काढला होता. मात्र, सरकारने विरोधी पक्षाच्या खासदारांना अटक केली. यावरूनही ठाकरेंनी सरकावर सडेतोड टीका केली. ते म्हणाले, केंद्र सरकारने केलेला तमाशा लांच्छनास्पद आहे. खासदारांना सांगण्यात आले की निवडणूक आयोगाकडे नेतो आणि पोलिस स्टेशनला नेलं. हे करून सरकारने लोकशाहीला काळीमा फासला आहे, असं ते म्हणाले.

आमची निवडणूक आयोगाविरोधात लढाई, सरकार का मध्ये पडतंय?, ठाकरेंचा सवाल 

पुढं ठाकरे म्हणाले, निवडणूक आयोगाच्या विरोधात आमची लढाई सुरू आहे. पण यात भाजप का पडतंय हे आता उघड झालं. राहुल गांधी यांनी मतांची चोरी कशी झाली हे सप्रमान दाखवून दिलं, आणि आपली चोरी लपवण्यासाठी सरकारमध्ये पडतंय, असंही ठाकरे म्हणाले.

पुढं ते म्हणाले, जी मते आपल्या विरोधात आहेत, त्याची छाटणी करायची आणि मतांची चोरी करून आपली मते वाढवायची, हा लोकशाहीवरचा दरोडा आहे. सरकार दरोडा टाकण्याचं काम करत आहे. आपण हा मुद्दा देशभर लावून धरला पाहिजे. हा देशाच्या लोकशाहीचा मुद्दा आहे. कारण, सहा महिन्यांत ४५ लाख मते वाढली. ही मतं आली कुठून?, असा सवाल ठाकरेंनी केला.

 

 

 

follow us