राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांचा रक्षाबंधन कार्यक्रमात सन्मान, काय म्हणाले मुख्यमंत्री?

राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांचा रक्षाबंधन कार्यक्रमात सन्मान, काय म्हणाले मुख्यमंत्री?

Rajasthan CM Bhajan Lal Sharma : जयपूर येथे मुख्यमंत्री आवासमध्ये राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी आयोजित केलेल्या रक्षाबंधन कार्यक्रमात १४३ देशांमध्ये ध्यानधारणेचे प्रशिक्षण देत असलेल्या प्रजापिता (Sharma) ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या जयपूर येथील वैशालीनगर सेवाकेंद्राच्या सहसंचालीका बी के चंद्रकला दीदी यांनी राखी बांधली.

ब्रेकिंग : हस्तक्षेप करता येणार नाही; मुंबईतील कबुतर खान्याबद्दल सुप्रीम कोर्टाचा जैन समाजाला दणका

यावेळी मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांना निराकार परमपिता परमात्मा शिवबाबांची फ्रेम देऊन १८३ विश्वविक्रम करणारे १ ले भारतीय ध्यानधारणा प्रशिक्षक डॅा. दीपक हरके यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं. यावेळी बी. के. चंद्रकला दीदी, बी के जयंती दीदी, बी के एकता दीदी, बी के दिवाकर भाई व बी के रतन भाई उपस्थित होते.

मुख्यमंत्री भजनलाल शर्मा म्हणाले की, आपली परंपरा आणि वारसा पुढे नेण्यात बहिणींची महत्त्वाची भूमिका आहे. बहिणी कुटुंबात विविध भूमिका बजावतात आणि त्यात मूल्ये जोपासण्याची आणि रुजवण्याची जबाबदारी घेतात. म्हणूनच आपल्या संस्कृतीत बहिणींना सर्वोच्च स्थान आहे. रक्षाबंधनाच्या या पवित्र सणाला मला लहान आणि मोठ्या बहिणींचे प्रेम आणि आशीर्वाद मिळाले आहेत. हे माझ्यासाठी एक अभेद्य संरक्षणात्मक कवच आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या