आमची निवडणूक आयोगाविरोधात लढाई, सरकार का मध्ये पडतंय?, ठाकरेंचा सवाल

मतांची छाटणी करायची आणि आपली मत वाढवाची हा लोकशाहीवरचा दरोडा आहे. हे सरकार दिवसाढवळ्या लोकशाहीची हत्या करत आहे,

Uddhav Thackeray

Uddhav Thackeray : व्होट चोरीच्या (Vote Chori) विरोधात इंडिया आघाडीच्या (India Alliance) खासदारांनी सोमवारी संसद भवनापासून निवडणूक आयोगाच्या (Election Commission) मुख्यालयापर्यंत मोर्चा काढला होता. हा मोर्चा अडवत पोलिसांनी अनेक विरोधी नेत्यांना ताब्यात घेतले. यानंतर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) पत्रकार परिषद घेत सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

बीड जिल्ह्यात पु्न्हा एकदा धाड..धाड; गेवराई शहरात खरेदीसाठी आलेल्या महिलांवर गोळीबार 

मतांची छाटणी करायची आणि आपली मत वाढवाची हा लोकशाहीवरचा दरोडा आहे. हे सरकार दिवसाढवळ्या लोकशाहीची हत्या करत आहे, अशी टीका ठाकरेंनी केली. तसंच आमची निवडणूक आयोगाविरोधात लढाई, सरकार का मध्ये पडतंय?, असा सवालही ठाकरेंनी केला.

आमची लढाई निवडणूक आयोगाविरोधात 

पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे म्हणाले, निवडणुक आयोगावर इंडिया आघाडीच्या खासदारांनी मोर्चा काढला होता. मात्र, सरकारने विरोधी पक्षाच्या खासदारांना अटक केली. हे लांच्छनास्पद आहे. निवडणूक आयोगाकडे नेतो असं सांगत पोलिसांनी त्यांना अटक केली.  संविधानिक मार्गाने मोर्चा काढलेला  असताना अटक करणं हा आपल्या लोकशाहीला बट्टा आहे. हा बट्टा सरकारने लावला आहे. आमची ही लढाई निवडणूक आयोगाविरोधात आहे, यात सरकार का पडतेय आहे. यात सरकारने पडायंच कारण म्हणजे, सरकारने मतांची चोरी केली आणि आपली चोरी सरकारला लपवायची आहे, असं ठाकरे म्हणाले.

ब्रेकिंग : मुंबईतील कबुतर खान्यांबद्दल सुप्रीम कोर्टाचाही दणका; म्हणाले हस्तक्षेप करता… 

विरोधी पक्ष नेता म्हणून शपथ घेतल्यानंतर निवडणूक आयोग राहुल गांधींनाच अॅफिडेव्हिट मागत आहे, का कुठला उरफाटा कारभार आहे, असंही ते म्हणाले.

SC पेक्षा निवडणुक आयुक्त मोठे आहेत का?
ठाकरे म्हणाले,  बिहारमध्ये मतदान यादीतील वगळलेल्या नावांची यादी सुप्रीम कोर्टाने निडणूक आयोगाल मागितली. मात्र, वगळेली नाव देण्याला आम्हाला बंधनकारक नाही, असं निवडणूक सांगत असेल तर हा सर्वोच्च न्यायालयाचा अपमान आहे. सर्वोच्च न्यायालयापेक्षा निवडणूक आयुक्त मोठे आहेत की काय? असा सवाल ठाकरेंनी केला. पुढं ते म्हणाले, मतांची छाटणी करायची आणि आपली मत वाढवाची हा लोकशाहीवरचा दरोडा आहे. हे सरकार दिवसाढवळ्या लोकशाहीची हत्या करत आहे, असं ठाकरे म्हणाले.

पुढं ते म्हणाले, भ्रष्टाचाऱ्यांना सोबत घेऊन राज्य चालवलं जातं आहे. आम्ही मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचे राज्यपालांना सर्व पुरावे दिले तरी राज्यपाल काही करत नाहीत. दिवसाढवळ्या लोकशाहीची हत्या होत आहे, असं ठाकरे म्हणाले.

follow us