Download App

उद्धव ठाकरेंकडून अमित शाहांचा बाजारबुणगे म्हणून उल्लेख, म्हणाले, ‘हिंमत असेल तर…’

हे बाजारबुणगे आहेत, त्यांना महाराष्ट्र टाचेखाली घ्यायचा, पण हा महाराष्ट्र वीरांचा आहे, असा इशारा उद्धव ठाकरेंनीनी अमित शाहांना दिला.

  • Written By: Last Updated:

Uddhav Thackeray On Amit Shah : छत्रपती संभाजीनगर येथील भाजपचे सरचिटणीस डॉ. दिनेश परदेशी (Dinesh Pardeshi) यांनी बुधवारी भाजपला सोडचिठ्ठी देत ठाकरे गटात प्रवेश केला. पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकर (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत त्यांनी हातावर शिवबंधन बांधले. यावेळी बोलतांना उद्धव ठाकरेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यावर जोरदार टीका केली. त्यांनी शाह यांचा उल्लेख बाजारबुणगे असा केला.

Nora Fatehi: चिघळलेली दुखापत, पायाला सूज.. तरीही अभिनेत्री करणार परफॉर्म 

यावेळी बोलतांना ठाकरे म्हणाले की, सर्व शिवसैनिकांचं मातोश्रीमध्ये स्वागत आहे. गेल्या आठवड्यात मी वैजापूरला येऊन गेलो, त्याचवेळी परेदशी प्रवेश करणार होते. पण त्यावेळी तो प्रवेश झाला नाही. पण आता तुमचा उलटा प्रवास सुरू झाला आहे. भाजपमधून तुम्ही इकडं आलात, भाजपच्या कट्टर कार्यकर्त्याला तुमच्यामध्ये सुरू झालेला भेसळीचा कार्यक्रम तुम्हाला मान्य आहे का, असा सवाल ठाकरेंनी केला.

Nora Fatehi: चिघळलेली दुखापत, पायाला सूज.. तरीही अभिनेत्री करणार परफॉर्म 

हिंदुत्त्वाच्या नावावर या लोकांनी थोतांड माजवलं, माझं हिंदुत्व वेगळं आहे, असंही ठाकरे म्हणाले.

यावेळी उद्धव ठाकरेंनी अमित शाह यांचाही जोरदार समाचार घेतला. ठाकरे म्हणाले, काल – परवाच महाराष्ट्रा बाहेरचे बाजारबुणगे नागपूरमध्ये येऊन गेले आणि आम्हाला खतम करण्याची भाषा करून गेले. आता ते भाषण मी पण ऐकलं नाही, हे बाजारबुणगे आहेत, त्यांना महाराष्ट्र टाचेखाली घ्यायचाय त्यांना कल्पना नाही हा महाराष्ट्र वीरांचा आहे, असा इशाराही ठाकरेंनी दिला.

दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुशखबर; शासनाकडून अनुदानात वाढ… 

पुढं बोलतांना ठाकरे म्हणाले, बाजारबुणगे असा शब्द जाणीवपूर्वक वापरतो. ठाकरेंना खतम करा, पवार साहेबांन खतम करा, असं बाजारबुणगा म्हणतो. हिंमत असेल तर येऊन बघ, कोणाला महाराष्ट्र खतम करतो, ते दाखवून देतो, असं आव्हान ठाकरेंनी दिलं.

रमेश बोरणारे यांच्यावरही टीका...
ठाकरे म्हणाले, वैजापूर आपला मतदारसंघ आहे, वाणी कुटुंबाल धन्यवाद देतो. वाणी साहेब आपल्या सोबत नाहीत, पण वाणीसाहेबांची निष्ठा घेऊन त्यांचं कुटुंब शिवसेनेसोबत राहिलं आहे. वाणी साहेबांना निवडणूक लढवण्याची विनंती केली होती, तुम्ही उमेदवार म्हणून आग्रह केला होता. मात्र, त्यांनी नव्या माणसाला पुढं आणू म्हटलं. पण त्यांना काय माहिती तो गद्दार निघेल, असा हल्लाबोल ठाकरेंनी रमेश बोरणारे यांच्यावर केला.

आगामी विधानसभा निवडणुकीत वैजापूरमध्ये निष्ठेचा भगवा फडकवा, मी वैजापूरला प्रचारासाठी येईनचं, विजयाची जबाबदारी मी तुमच्यावर सोपवतो, असंही ठाकरे म्हणाले.

follow us