Download App

Uddhav Thackeray म्हणतात… निवडणूक आयोगाविरोधात देशभर रान पेटणार!

  • Written By: Last Updated:

मुंबई : निवडणूक आयोग म्हणजे सुलतान नाही. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे हे प्रकरण आता देशभर पेटेल. आज देशातील एका पक्षावर वेळ आली आहे, तर उद्या ही वेळ इतर पक्षांवरही येण्याची शक्यता असून पक्षही संपवतील की काय, अशी भीती उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी व्यक्त केली आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटाला शिवसेनेचे चिन्ह आणि पक्ष दिला आहे. त्यामुळे आता ठाकरे गट आणि शिंदे गटातील वाद शिगेला पोहचला आहे. शिवसेनेचे चिन्ह आणि पक्ष शिंदे गटाला देण्याचा निर्णय झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यासह संजय राऊत यांनीही शिंदे गटावर सडकून टीका केली होती.

उद्धव ठाकरे म्हणाले की, या प्रकारचे निर्णय निवडणूक आयोग देत असेल तर त्यांच्यावर खटला भरला जाईल. ज्या प्रकारे निवडणूक आयोगाने निर्णय दिला आहे. त्याविरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात या आदेशाला आव्हान देणार आहे. निवडणूक आयोग जर आमदार, खासदारांच्या संख्येवर निर्णय देत असतील तर योग्य नाही. त्यामुळे हा निवडणूक आयोगा बरखास्त केला पाहिजे.

निवडणुकीच्या प्रक्रियेमुळे निवडणूक आयोग नेमला पाहिजे. हा राजकीय अन्याय झाला आहे. पक्षाचे हे चिन्हं दिलं असलं तरी शिवसेना संपेल असं त्यांना वाटत असेल तर ते चुकीचं आहे. या प्रकारचे निर्णय निवडणूक आयोग देत असेल तर त्यांच्यावर खटला भरला जाईल, असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिला.

follow us