Download App

मोदी-शाहांना महाराष्ट्राविषयी आकस, ते तुळजाभवानीच्या मंदिरात का गेले नाहीत? ठाकरेंचा सवाल

महाराष्ट्र, मराठी भाषा आणि भवानी माता याबाबत मोदी आणि शाह यांच्या मनात आकस आहे. त्यामुळं ते सगळ्या मंदिरात जाऊन आले. पण, तुळजाभवानी मंदिरात गेले नाही.

  • Written By: Last Updated:

Uddhav Thackeray on BJP : राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित न राहिल्याने भाजप (BJP) सातत्याने उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) टीका करत आहे. काल नवनीत राणांच्या (Navneet Rana) प्रचारार्थ झालेल्या सभेत बोलतांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनीही ठाकरेंवर टीका केली होती. उद्धव ठाकरे सोनिया गांधींच्या भीतीमुळं राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहिले नाहीत, अशी त्यांनी केली. या टीकेला आता उद्धव ठाकरेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. मोदी-शाह तुळजाभवानीच्या मंदिरात का गेले नाहीत, असा सवाल त्यांनी केला.

लोकसभेसाठी शिवसेनेचा वचननामा जाहीर, ठाकरेंकडून शेतकरी, तरुणांसाठी ‘या’ मोठ्या घोषणा 

मातोश्री येथे पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरेंनी वचननामा प्रसिध्द केला. यावेळी बोलताना ठाकरे म्हणाले, 2014 आणि 2019 मध्ये आम्ही भाजपला पाठिंबा दिला. त्यावेळी मोदी सरकार मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी काम करेल, असे आम्हाला वाटले. पण, आमची फसवणूक झाली आहे. महाराष्ट्र, मराठी भाषा आणि भवानी माता याबाबत मोदी आणि शाह यांच्या मनात आकस आहे. त्यामुळं ते सगळ्या मंदिरात जाऊन आले. पण, तुळजाभवानी मंदिरात गेले नाही. मला राम मंदिरावरून प्रश्न विचारणाऱ्यांनी आधी या प्रश्नाचं उत्तर द्यावं की, तुम्ही अजून तुळजाभवानी मंदिराला का गेला नाहीत? असा सवाल ठाकरेंनी यावेळी उपस्थित केला.

नकली सेनेचा वचननामा नसून ‘यूटर्ननामा’, जनता फसवाफसवीला भुलणार नाही; बावनकुळेंचे टीकास्त्र 

यावेळी ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही टीका केली. मी काळाराम मंदिरात जाणार म्हटल्यावर ते झाडू घेऊन पोहोचले, असं म्हणत ठाकरेंनी मोदींवर टीका केली.

संविधान बदलायचं असल्याने पाशवी बहुमत हवं
ठाकरे म्हणाले, लहानपणी सर्वांनी ऐकले असेल की भूताची भीती वाटली की रामाचा जप करावा, भूतं पळतात, असं म्हणायचे. खरं खोटं मला माहित नाही. हीच भाजपची अवस्था आहे. भाजपला पराभव समोर दिसू लागल्यानं ते आता राम राम म्हणताहेत. हा त्यांचा नेहमीचाच उद्योग आहे. सुरुवातीच्या काळात ठीक होते. कारण अनेक वर्षांनी एक पक्ष सत्तेवर आला होता. पण आता त्यांना प्रचंड बहुमत हवे आहे, कारण, त्यांना देशाची घटना बदलायची आहे, असा घणाघात ठाकरेंनी केला.

मोदींना महाराष्ट्राविषयी आकस
मोदी सरकारला महाराष्ट्राविषयी आकस आणि द्वेष वाटतो. मोदी सरकार महाविकास आघाडीला मदत करत नव्हते. उलट महाराष्ट्राचं वैभव लुटून ते गुजरातला पळवलं गेलं. आघाडीचं सरकार आल्यानंतर जो काही खड्डा पाडलेला आहे, तो आम्ही भरून काढू. आम्ही गुजरातचे काहीही हिसकावून घेणार नाही. प्रत्येक राज्याचा आदर ठेवून त्यांना जे हवंय, ते देऊच. मात्र, महाराष्ट्रात आम्ही रोजगार देऊ, ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रोजगार देऊ, प्रत्येक जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये आधुनिक यंत्रणा आणू, अशी घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली.

follow us