राम मंदिर प्राणप्रतिष्ठा; 55 देशांच्या 100 नेत्यांना निमंत्रण, बॉलिवूडचा स्टार आयुष्मान खुराना सहभागी होणार

राम मंदिर प्राणप्रतिष्ठा; 55 देशांच्या 100 नेत्यांना निमंत्रण, बॉलिवूडचा स्टार आयुष्मान खुराना सहभागी होणार

Ram Mandir Consecration: Most Valued भारतीय कलाकारांच्या यादी 13 व्या स्थानी बॉलिवूडचा (Bollywood) अष्टपैलू अभिनेता आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) याची ब्रँड व्हॅल्यू 49.5 मिलियन डॉलर इतकी आहे. बॉलिवूड स्टार आणि युवा आयकॉन आयुष्मान खुराना याला अयोध्येतील ऐतिहासिक राम मंदिर प्राणप्रतिष्ठा (Ram Mandir Pran Pratishta) कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी निमंत्रण देण्यात आले आहे.

या शुभ समारंभात आयुष्मान, विराट कोहली, सचिन तेंडुलकर, अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर, रजनीकांत, मनमोहन सिंग, धनुष, मोहनलाल, रणबीर कपूर, आलिया भट्ट, अजय देवगण, प्रभास, यश या भारतीय चित्रपट उद्योगातील आणि उद्योगपतींसह भारतातील सर्वात मोठ्या दिग्गजांसोबत सामील होणार आहे. जसे की मुकेश अंबानी, अनिल अंबानी, रतन टाटा, गौतम अदानी आणि टीएस कल्याण रामन यांना राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी निमंत्रण देण्यात आले आहे.

मुंबईतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) मुंबई महानगर संपर्क प्रमुख, CA अजित पेंडसे यांनी ‘राम लल्ला’च्या भव्य अभिषेक सोहळ्यासाठी आयुष्मानला वैयक्तिकरित्या निमंत्रण देण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार 22 जानेवारी रोजी ‘प्राण प्रतिष्ठे’च्या निमित्ताने एक लाखाहून अधिक भाविक मंदिरात दर्शनासाठी उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. या सोहळ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी राम मंदिरात येणार आहेत.

Ram Mandir: साऊथ सुपरस्टार राम चरणला राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण; म्हणाला…

याआधी साऊथ सुपरस्टार राम चरणला निमंत्रण देण्यासाठी सुनील आंबेकर हैदराबाद येथील अभिनेत्याच्या घरी गेले. या प्रसंगाचा नवीन फोटो सोशल मीडियावर सध्या चर्चेचा विषय बनला आहे, यामध्ये राम, उपासना आणि सुनील एकत्र दिसत आहेत. या कार्यक्रमाला केवळ भाविकच नाही तर अनेक सेलिब्रिटी, राजकीय नेते, उद्योगपती आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांचीही उपस्थिती अपेक्षित असल्याचे बघायला मिळणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube