Uddhav Thackeray Devendra Fadanvis Word War : उद्धव ठाकरेंनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ‘फडतूस’ (Fadtus) अशी टीका केली आहे. त्यांच्या या टीकेनंतर ठाकरे फडणवीसांमध्ये शाब्दिक युद्धाला सुरूवात झाली आहे. या दोघांमध्ये अशाप्रकारे शाब्दिक टीकाटिप्पणी होण्याची ही पहिलीच वेळ नाहीये. याआधीदेखील दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर टीका करताना शब्दांची मुक्ताफळे उधळली आहे. नेमकी कोणत्या नेत्यानी याआधी कुणावर काय टीका केली होती हे आपण या बातमीच्या माध्यामातून जाणून घेणार आहोत.
Uddhav Thackeray फडणवीसांना फडतूस म्हणाले… अन् राज्यात धुरळा उडाला!
उद्धव ठाकरे म्हणजे ‘टोमणे सम्राट’
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे आपल्या शाब्दिक टोमण्यासाठी ओळखले जातात. भाजपचे नेते त्यांची संभावना ‘टोमणे सम्राट’ म्हणूनच करतात. मात्र, तरीही ठाकरेंनी थेट फडणवीसांना अंगावर घेण्याचे अनेकदा टाळले. परंतु, राज्यात जून महिन्यात सत्तांतर झाल्यानंतर आणि आपली सत्ता गेल्यानंतर ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना जादा लक्ष्य केले. पण ते थेट फडणवीस यांच्याबाबत कठोर शब्दांचा वापर करणे टाळत होते. मात्र, आज ‘फडतूस’ या शब्दाच्या वापरानंतर ठाकरे हे अधिक आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे.
उद्धव ठाकरे यांची सत्ता गेल्यानंतर बुलढाण्यामध्ये जोरदार सभा झाली होती. या सभेत शेतकऱ्यांच्या वीजबिल माफीचा मुद्दा ठाकरे यांनी उपस्थित केला. ठाकरे सरकारने शेतकऱ्यांसाठी वीज बिलात कोणताच दिलासा दिला नव्हता असा आरोप फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी केला होता. या आरोपाला उत्तर देताना ठाकरेंनी ‘जरा तरी लाज बाळगा’ असे म्हणत शेतकऱ्यांसाठी आम्ही काय उपाययोजना केल्या हे जाहीरपणे सांगितले होते. ठाकरे यांच्या ‘लाज बाळगा’ या विधानालाही फडणवीस यांनी तेव्हा जोरदार उत्तर दिले होते.
कोरोना काळामध्ये तेव्हा ठाकरे सरकार सत्तेवर होते. मंदिरे उघडण्यासाठी भाजपा आक्रमक झाला होता, एवढेच नव्हे तर, ‘घंटा बजाओ’ आंदोलन भाजपने राज्यभर सुरू केले होते. तेव्हा फडणवीस यांना ‘घंटाधारी’ म्हणून ठाकरे यांनी टोमणा मारला होता. एवढेच काय तर, अयोध्येतील राम मंदिराच्या श्रेयावरूनही शिवसेना आणि भाजप यांच्यातील कलगीतुरा रंगला होता. आम्ही कायदे पाळायचे फडणवीस यांनी काय डुकरे पकायची का? अशी टीका उद्भव ठाकरेंनी नुकत्याच झालेल्या दसरा मेळव्यात केली होती.
करोना संकटात जनता असताना यांनी वखवखाले पानाने सत्ता मिळवल्याचीदेखील टीका सामनाच्या मुलाखतीत भाजपवर करण्यात आली होती. याशिवाय मास्तर नाही तर ही लाफ्टर सभा अशी टीका देवेंद्र फडणवीसांनी ठाकरेंच्या सभांवर केली होती. कितने आदामी थे ….. ५५ निकल गये अब दो बाकी है अशी मिश्किल टीकादेखील देवेंद्र फडणवीसांनी सत्तांतरानंतर ठाकरेंवर केली होती.
ीबाबरी मशीद पाडण्याचे श्रेय हे शिवसेनेचे नसून, भाजपच्या मंडळींनीच हे कृत्य केल्याचे त्या पक्षाचे नेते राम मंदिर पायाभरणीच्या वेळी सांगत होते. त्यालाही ठाकरे यांनी आपल्या टोमणे शैलीत उत्तर दिले होते. फडणवीस यांच्या वजनानेच बाबरी मशीद पडली असती असे म्हणत त्यांनी थेट फडणवीस यांच्या वजनालाच लक्ष्य केले होते.
2017 मध्येही दोघांमध्ये रंगले होते युद्ध
फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात असे शाब्दिक युद्ध होण्याची ही पहिलीच वेळ नाहीये. या दोघांमधील भांडण मुंबई महानगरपालिकेच्या 2017 च्या निवडणुकीतही रंगले होते. भाजपशी युती करून शिवसेना सडली या ठाकरे यांच्या उद्गारानंतर भाजपा चांगलीच आक्रमक झाली होती. 2017 मध्ये ठाण्याच्या प्रचारसभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी ठाण्याचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्यावर टीका करत ते फडणीस यांच्या घरी भांडी घासत असतात असा टोला लगावला होता.
अर्थात ठाकरे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर याच परमवीर सिंग यांना मुंबईचे पोलीस आयुक्त नेमण्यात आले होते. या नियुक्तीनंतर ठाकरे यांना मोठा झटका बसला होता. संजय राऊत, विनायक राऊत आदी नेते फडणवीस यांना लक्ष्य करत होते. आता खुद्द ठाकरे यांनी फडणवीस यांच्यावर प्रहार केल्याने या दोघांमधील राजकीय वाद आणखी रंगण्याची चिन्हे आहेत.