Uddhav Thackeray on Eknath shinde : शिवसेना शिंदे गट आणि भाजपकडून ठाकरे गटातील अनेक शिवसैनिकांना फोडून आपल्या बाजूला घेतले. त्यावरुन उद्धव ठाकरेंनी शिंदे गटासह भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. आज मातोश्रीबाहेर जमलेल्या शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी ठाकरेंनी शिवसेना शिंदे गट आणि भाजपला एकप्रकारे आभार मानले आणि सांगितले की, दर आठवड्याला आमच्यातला माणूस फोडा, त्यामुळे बिनकामाची माणसं गेल्यानंतर शिथिलता आलेले शिवसैनिक पेटून उठतील असंही उद्धव ठाकरे म्हणाले.(Uddhav Thackeray Criticize on eknath shinde BJP matoshree shivsainik mumbai Shivsena thackeray group)
अतुल लोंढेंनी केसरकरांची इज्जतच काढली म्हणाले, देश कसा चालवायचा काँग्रेसला…
उद्धव ठाकरे म्हणाले की, होय आपण जिंकायचंच आहे, आणि गद्दारांना गाडायचंच. राज्यभरात मी ज्या-ज्या ठिकाणी जातोय त्या-त्या ठिकाणी मला प्रत्येक शिवसैनिक सांगत आहे की, होय आम्ही तुमच्यासोबत आहोत.
‘गांधीजींसारखा दुसरा कोणी होणे नाही’; भिडेंच्या वादग्रस्त वक्तव्यावर मनसेची पोस्ट
ठाकरे म्हणाले की, मला एका गोष्टीचा खूप अभिमान आहे की, 2007 सालच्या निवडणुकीवेळीही असं वातावरण होतं की, आता शिवसेनेचं काय होणार? महापालिकेत शिवसेना जिंकणार की हरणार आणि आपण विजय मिळवला. तुम्हा शिवसैनिकांच्या मेहनतीने आपण विजय मिळवला. अशीच गर्दी चौफेर पसरली होती, अशी एक आठवण उद्धव ठाकरे यांनी सांगितली.
अश्रुचं मोल ज्यांना कळतं तोच निष्ठावान असतो. ज्यांना-ज्यांना अजिर्ण झालं ते ते निघून गेले. तरीदेखील आपलं जे शिवभोजन आहे, त्यात अनेकजण पोट भरुन जेऊन दुसऱ्या पक्षात जातात, ते काही संपू शकत नाही हीच खरी आपली ताकद आहे, असाही टोला यावेळी उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना लगवला.
जे गेलेत त्यांना त्यांचं सुख लख लाभो असं मात्र माझं सुख तुमच्यामध्ये या शिवसैनिकांच्या साथी सोबतीमध्ये आहे. कोणी कितीही गेले तरी ते काही कोणी हिरावून घेऊ शकत नाही असंही यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले.