‘गांधीजींसारखा दुसरा कोणी होणे नाही’; भिडेंच्या वादग्रस्त वक्तव्यावर मनसेची पोस्ट

‘गांधीजींसारखा दुसरा कोणी होणे नाही’; भिडेंच्या वादग्रस्त वक्तव्यावर मनसेची पोस्ट

Raj Thackeray On Sambhaji bhide : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे संस्थापक मनोहर उर्फ ​​संभाजी भिडे (Sambhaji bhide) यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करून वाद निर्माण केला. अनेकदा अतार्किक आणि वादग्रस्त विधाने करणाऱ्या भिडे यांच्याविरोधात राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह सामाजिक संघटनांनी भिडेंचा निषेध केला आहे. राजकीय नेत्यांसह अनेक संघटनांनी भिडेंच्या अटकेची मागणी केली. आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी भिडे यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. मनसेने राज ठाकरेंची एक जुनी पोस्ट ट्विट  करत ‘गांधीजींसारखा दुसरा कोणी होणे नाही, असं म्हटलं. (Raj Thackeray indrect target Sambhaji bhide over the critisize of Mahatma Gandhi)

भिडे यांनी एका कार्यक्रमात बोलताना राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह विधान केले होते. त्यांच्या या वक्तव्याचे पडसाद राजकारणातही उमटले. भिडेंवर तात्काळ कारवाई करा अशा अनेक प्रतिक्रिया येत आहेत. भिडे यांच्या वक्तव्याविरोधात ठिकठिकाणी निदर्शने होत आहेत. अशातच राज ठाकरेंची एक जुनी पोस्ट मनसेंनं शेअर केली. त्यात लिहिलं की, महात्मा गांधी हे गेल्या शतकातील एकमेव असे नेते आहेत की, जे देशांच्या सीमा तोडून पसरत गेले. तेही इंटरनेट, सोशल मीडिया, मोबाईल नसतांना. गांधीजींचा प्रभाव असा काही पसरत गेला की, केवळ भारतातच नव्हे, तर जवळपास तीन खंडांतील देशांमध्ये स्वातंत्र्याची आस जागृत झाली आणि ब्रिटिश राजवटीचा सूर्य मावळला. पण गांधीजींना जे जमलं ते पुढे जवळजवळ कोणालाच जमलं नाही.

विशिष्ट सामाजिक-राजकीय परिस्थितीत प्रबळ वाटणारे नेते आले, अत्यंत लोकप्रिय झाले आणि पुढं काही वर्षांतच मागे पडलेले दिसले. दुसरं महायुद्ध जिंकल्यानंतर चर्चिल, जगाला फॅसिझमच्या विळख्यातून सोडवणारा तारणहार म्हणून उदयास आले, परंतु त्यांची लोकप्रियता झपाट्याने कमी झाली. ह्याला कारण चर्चिल ह्याचं योगदान हे एका विशिष्ट परिस्थितीला पूरक होतं,ते चिरकाल टिकावं असं नव्हतं. पण, गांधीजींचं तत्वज्ञान व्यापक होतं.

National Lipstick Day : 5 हजार वर्षापूर्वी येथे मौल्यावान रत्नांपासून बनवल्या जायच्या लिपस्टिक… 

श्रृंखला मग त्या अज्ञानाच्या असोत, की गुलामगिरीच्या, वसाहतवादाच्या असोत किंवा जातीच्या असोत, त्या श्रृंखलांनी कुठल्याही माणसाला बांधून ठेवण्याचा अधिकार कोणालाच नाही, कारण सर्व माणसं मुळात समान आहेत, इतकं साधं तत्व त्यांनी स्वीकारले आणि त्यासाठी संघर्ष केला.

हे अत्यंत अवघड आणि दुर्मिळ आहे, त्यामुळे गांधीजींसारखा दुसरा कोणी होणे नाही. गांधीजींच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे विनम्र अभिवादन.

भिडे काय म्हणाले?
एका कार्यक्रमात बोलताना संभाजी भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबाबत अत्यंत आक्षेपार्ह विधान केले होते. महात्मा गांधींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे म्हटले जाते, परंतु करमचंद गांधी हे मोहनदास यांचे खरे वडील नसून एक मुस्लिम जमीनदार त्यांचे खरे वडील आहेत. त्यांच्या या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे. भिडे यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर काँग्रेस पक्षाने आक्रमक भूमिका घेत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube