Download App

पंतप्रधान मोदींना गांभीर्य आहे का?; त्यांची गरज संपली का?, RSS च्या टिपण्णीवरुन ठाकरेंची टीका

उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना भाजपसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. तसंच, काही प्रश्नही उपस्थित केले.

  • Written By: Last Updated:

Uddhav Thackeray on RSS :  सध्या राष्ट्रीय स्वयंकेवक संघ, भाजप आणि यांना ऐकमेकांची गरज हा विषय चर्चेत आहे. (Uddhav Thackeray ) यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुखपत्रातूनही भाजपबद्दल जाहीर नाराजी व्यक्त करणया आलीये. दरम्यान, यावर आता शिसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रश्न करत मोदींना सल्लादेखील दिला आहे. (RSS) ते म्हणाले, सरसंघचालक मोहन भागवत जे बोलले त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींना गांभीर्य आहे का? की त्यांची आरएसएसची गरज संपली? आतातरी पंतप्रधान आणि गृहमंत्री मणिपूरला जाणार आहेत का? असे प्रश्न उद्धव ठाकरेंनी उपस्थित केले आहेत. ते पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

भाजप सुधारणार आहे का? नवीन ट्विस्ट? राऊतांचं मोठं वक्तव्य, म्हणाले,  मोदींना पर्याय शोधतेय’

अजित पवारांना महायुतीमध्ये घेणं चुकीचं होतं, असं आरएसएसचं मुखपत्र ऑर्गनायझरने म्हटलं आहे. त्यावर भाजपला प्रश्न विचारले पाहिजेत. देशातल्या मतदारांनी तर भाजपला खडे बोल सुनावले आहेत, आतातरी भाजप सुधारणार आहे का? की देशातल्या प्रतिपक्षांना संपवणार आहे? असा उलट प्रश्नही उद्धव ठाकरेंनी यावेळी उपस्थित केला आहे. काही दिवसांपूर्वी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी आम्हाला संघाची गरज नाही अशा आशयाचं वक्तव्य केलं होत. त्यावरही उद्धव ठाकेर बोलले होते.

काय लिहलं आहे मुखपत्रात?

संघाच्या मुखपत्राध्ये अजित पवारांशी युती केल्यामुळे भाजपच्या ब्रँडला धक्का बसला असल्याचं म्हटलं आहे. महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्याकडे पुरेसं बहुमत असताना अजित पवारांना सोबत का घेतलं? असा प्रश्न या मुखपत्रातून उपस्थित करण्यात आला आहे. संघाला दहशतवादी संघटना असं म्हणणाऱ्या नेत्यांना भाजपात प्रवेश दिल्याने संघ स्वंयसेवकांची मनं दुखावली आहेत, असंही त्यामध्ये लिहण्यात आलं आहे.

स्वंयसेवकांची मनं प्रचंड दुखावली Modi 3.0 : PM मोदींचे मंत्रिमंडळ किती शिकलेले? जाणून घ्या, प्रत्येक मंत्र्याची शैक्षणिक पार्श्वभूमी

दहशतवादाला सक्रियपणे प्रोत्साहन देणाऱ्या आणि हिंदूंचा छळ करणाऱ्या, २६/११ ला RSS की साझीश म्हणणाऱ्या आणि RSS ला दहशतवादी संघटना म्हणणाऱ्या या काँग्रेसजनांना भाजपचे नेते बनवण्यात आले, त्यांनी चूक केली किंवा झाल्याची खेदाची नोंदही केली नाही. की त्यांना त्यांच्या मालकांनी खोटे बोलण्यास भाग पाडले. यामुळे आरएसएसच्या स्वंयसेवकांची मनं प्रचंड दुखावली आहेत, असं लेखामध्ये म्हटलं आहे.

Tags

follow us