Download App

भाजपचं हिंदुत्व बेगडी, हा सगळा कचरा साफ करणार; उद्धव ठाकरे कडाडले

  • Written By: Last Updated:
Image Credit: Letsupp

Uddhav Thackeray : अयोध्येत 22 जानेवारीला राममंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. सगळेच या ऐतिहासिक दिवसाची वाट पाहत असतो. तर दुसरीकडे राममंदिरावरून (Ram Mandir) राजकारणही सुरू आहे. विरोधी पक्षांचा आरोप आहे की, भाजप मंदिराचा राजकीय लाभ उठण्याचा प्रयत्न करतंय. अशातच ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) राममंदिर मुद्यावरून भाजपवर सडकून केली. भाजपचं (BJP) हिंदुत्व बेगडी आहे, अशी टीका त्यांनी केली.

Box Office: ‘मेरी ख्रिसमस’ ठरणार कतरिनाचा सगळ्यात कमी ओपनिंग करणारा चित्रपट? 

भाजपचं हिंदुत्व बेगडी
उद्धव ठाकरेंनी आज एका कार्यक्रमाला हजेरी लावली. त्यावेळी बोलतांना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. ते म्हणाले, आज सर्व देशभक्त एकत्र आहेत. आपलं हिदुत्व बेगडी नाही. आपण हिंदुत्व सोडू शकत नाही. भाजपला त्यांच्या ढोंगीपणामुळं आपण सोडलं. मिधे मंदिर साफ करताहेत. पण, आता त्यांना आपल्याला साफ करायचं आहे, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यावर जोरदार निशाणा साधला.

ते म्हणाले, काही ठिकाणी भिंतींवर सरकारी जाहिराती छापल्या जातात. मतदानाचा हक्क बजावा असं एका बाजूला लिहिलेलं आणि दुसऱ्या बाजूला कचरा साफ करा असं लिहिलं. हे खूप अर्थपूर्ण आहे, असं म्हणत त्यांनी सरकारला टोमणा मारला.

मुंबईमुळे ‘मविआ’त फाटणार? ठाकरेंकडील दोन विजयी जागांसह चार मतदारसंघांवर काँग्रेसचा दावा 

दलाली विचाराचे हिदूत्व मला मान्य नाही
ठाकरे म्हणाले,गेल्या कित्येक शतकांपासून राम मंदिराचा लढा सुरू आहे.अनेक कारसेवकांनी आपलं रक्त सांडलं. हे राम मंदिर बांधताहेत म्हणून राम धर्तीवर आलेत, असं त्यांना वाटतं. लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांचे विचार खरे होते. त्यांचे राम मंदिराच्या लढ्यात योगदान होते. अटल बिहारींचा जो भाजप होता, त्यांच्यासोबत आमची युती होती. आताच्या भाजपने अटलजींचे विचार सोडून दलाली सुरू केली. हे दलाली विचाराचे हिदूत्व मला मान्य नाही, अशी घणाघाती टीका ठाकरेंनी केली.

ठाकरे म्हणाले, राम मंदिर हा देशाचा धार्मिक सोहळा आहे. तेव्हा राष्ट्रपतींच्या हातून उद्घाटन आवश्यक होते. सोमनाथ मंदिराच्या उद्घाटनाच्या वेळी तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांना बोलावलं होतं. त्याचप्रमाणे आताही राष्ट्रपतींच्या हस्ते राम मंदिराचे उद्घाटन व्हायला काय हरकत आहे. अयोध्येतीतील राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा ही केवळ राममूर्तीची नाही, तर राष्ट्राची प्राणप्रतिष्ठा आहे. देशाच्या अस्मितेची प्राणप्रतिष्ठा आहे. त्यामुळं भाजपने जरी राष्ट्रपतींना मान दिला नसला तरी आम्ही तसं करणार नाही. आम्ही काळाराम मंदिराचं राष्ट्रपतींना निमंत्रण दिलं. तिथं महाआरतीचा कार्यक्रम आहे, राष्ट्रपतींच्या हस्ते महाआरती करू, असं ठाकरे म्हणाले.

पंतप्रधान मोदींनी अटल सेतूचे उद्घाटन केले. त्यावरून ते एकटेच चालत होते. एकाचाच फोटो, अटल बिहारी वाजपेयींचा फोटो नव्हता नव्हता. जाहीरातमध्ये देखील फोटो नाही. मी आपल्या साक्षीनं सांगतो, राष्ट्रपती आल्यावर राम मंदिर आणि गोदावरी आरतीमध्ये त्यांचा एकट्याचा फोटो छापला जाईल, असं ठाकरे म्हणाले.

follow us

वेब स्टोरीज