Box Office: ‘मेरी ख्रिसमस’ ठरणार कतरिनाचा सगळ्यात कमी ओपनिंग करणारा चित्रपट?

Box Office: ‘मेरी ख्रिसमस’ ठरणार कतरिनाचा सगळ्यात कमी ओपनिंग करणारा चित्रपट?

Merry Christmas Box Office Collection Day 2: कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विजय सेतुपती (Vijay Sethupathi) यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘मेरी ख्रिसमस’ (Merry Christmas Movie) अखेर 12 जानेवारी रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट गेल्या वर्षी प्रदर्शित होणार होता, मात्र चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले. (Box Office Collection) 21 डिसेंबर 2023 रोजी या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला होता, जो प्रेक्षकांना खूप आवडला होता. मात्र प्रदर्शित झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाला चाहत्यांकडून फारसा प्रतिसाद मिळत नाहीये आणि चित्रपट कमाईच्या बाबतीत फारशी कामगिरी करत नाहीये.

Sacknilk च्या रिपोर्टनुसार, ‘मेरी ख्रिसमस’ ने पहिल्या दिवशी 2.55 कोटींची ओपनिंग केली होती. आता दुसऱ्या दिवसाची प्राथमिक आकडेवारीही समोर आली आहे, त्यानुसार या चित्रपटाने आतापर्यंत केवळ 1.7 कोटींचा व्यवसाय केला आहे. यासह, देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर चित्रपटाच्या एकूण कलेक्शनने 4.25 कोटींची कमाई केली आहे.

12 जानेवारीला ‘मेरी ख्रिसमस’सोबत साऊथचे अनेक मोठे चित्रपट मोठ्या पडद्यावर दाखल झाले आहेत. या यादीत महेश बाबूचा गुंटूर करम, तेजा सज्जाचा हनुमान आणि शिवकार्तिकेयचा चित्रपट आयलन यांचा समावेश आहे. ‘मेरी ख्रिसमस’ बॉक्स ऑफिसवर कलेक्शनसाठी ज्या प्रकारे झगडत आहे, त्यावरून कतरिना-विजयच्या चित्रपटाला साऊथच्या चित्रपटांशी टक्कर सहन करावी लागत आहे.

बॉक्स ऑफिसवर कतरिनाच्या मेरी ख्रिसमसने केली निराशा, बजेटच्या तुलनेत केली फक्त इतकीच कमाई

चित्रपटाची स्टारकास्ट

श्रीराम राघवन दिग्दर्शित ‘मेरी ख्रिसमस’ हा चित्रपट क्राइम-थ्रिलर आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून कतरिना कैफ आणि विजय सेतुपती पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र आले आहेत. याशिवाय चित्रपटात संजय कपूर, टिनू आनंद आणि विनय पाठक यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube