Download App

‘बारसूत यायला वेळ नाही पण कानडी आप्पांचे भांडी घासायला गेलेत’

Uddhav Thackeray on Eknath Shinde : बेळगाव महापालिकेवरचा भगवा ध्वज काढला, छत्रपती शिवाजी महाराजांचे अपमान केला. पण आमचे हे मुख्यमंत्री बाळासाहेबांचे विचार. कसले बाळासाहेबांचे विचार. कानडी आप्पांचे भांडी घासायचे विचार? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची कानडीमध्ये जाहीरात छापली आहे. आमचे महाराष्ट्राचे मिंध्ये आणि लाचार मुख्यमंत्री कानडी आप्पांचे भांडी घासायला गेले आहेत, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केला आहे.

महाराष्ट्र एकीकरण समिती उचापती लोकांची संघटना आहे. आम्ही त्यांचा बंदोबस्त करु. असं एका ठिकाणी कर्नाटकचे मुख्यमंत्री बरळले. त्यांचा प्रचार करायला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कर्नाटकमध्ये गेलेत. गेल्या अनेक दशकांपासून कर्नाटक व्याप्त महाराष्ट्रातील मराठी माणूस टोहो फोडतोय, आहो आम्ही मराठी आहोत आम्हाला महाराष्ट्रात घ्या. पण कर्नाटकमध्ये मराठी भाषिकांवर अत्याचार होतोय, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

राज ठाकरेंनी सांगितलं पवारांचं राजीनामा मागे घेण्याचं कारण

आताच बारसूमध्ये एवढा पोलीस बंदोबस्त लावला आहे. उद्या रिफायनरी आल्यानंतर इथल्या भूमीपूत्रांनी भांडवलदारांच्या दारात कटोरे घेऊन भीक मागत फिरायचे का? हे आमदार खोके घेऊन मोकळे झालेत. पण कोकणचं वैभव का मारत आहात? कोकणच्या भूमिपुत्रांच्या पोटावर वरवंटा का फिरवत आहात? याचं उत्तर कोणाकडे आहे? तळये गावात दुर्दैवी घटना घडली होती. त्यावेळी मी सगळं प्रशासन कामाला लावलं होतं.

तळये गावाचं पुर्नवसन करायचं, जागा ठरवली. किती लोकांना घरं मिळाली? दोन वर्षे झाली अजून मदत मिळाली नाहीत. तळये गावातील 66 घरं नष्ट झाली त्यापैकी फक्त 15 घरं दिली आहेत. केळनेयी गावातील 128 घरं, साखर सुतारवाडी 44 घरं यापैकी एकाही घराचं काम सुरु झालं नाही? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

Sushma Andhare ; एमआयडीसीतून बाप-लेकांनी भंगार विकून खाल्लं

आपले मुख्यमंत्री, आमदार नुसते नॅपकीन टाकून जात येत असेल. नॅपकीनचा वापर आता तुम्ही करायला लावायचा आहे. त्याला आता घाम फोडायचा आहे की नॅपकीन कमी पडला पाहिजे. मी मुख्यमंत्री म्हणून अयोग्य होतो त्यामुळे तुम्ही गद्दारी केली तर दोन वर्षे होत आली अजून ह्या गावकऱ्यांना मदत का मिळाली नाही? सुरत, गुवाहाटी इकडे तिकडे जातात पण तळीये मध्ये आले होते का? मुख्यमंत्री दिल्लीच्या वाऱ्या करतील, दिल्लीला मुजरा मारायला जातात. बारसूत यायला त्यांना विस्मरण झालंय, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

Tags

follow us