Download App

Uddhav Thackeray : ‘देशाची अखंडता धोक्यात राज्यकर्ते मात्र निवडणूक प्रचारात’; ठाकरे गटाची जळजळीत टीका

Uddhav Thackeray : देशात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका (Lok Sabha Election) जवळ आलेल्या असताना उद्धव ठाकरे गटाने (Uddhav Thackeray) आपल्या टीकेची धार वाढविली आहे. मणिपुरातील हिंसाचार (Manipur Violence) आणि जम्मू काश्मिर राज्यातील ‘टार्गेट किलिंग’च्या घटनांचा उल्लेख करत केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. देशाची अखंडता धोक्याच्या वळणावर उभी आहे आणि राज्यकर्ते पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूक प्रचारात मश्गुल आहेत, अशी घणाघाती टीका ठाकरे गटाने सामनाच्या अग्रलेखातून केली आहे.

गेले काही दिवस मणिपूर शांत झाले असावे असा भास निर्माण झाला होता. मात्र मंगळवारच्या हिंसाचाराने ते राज्य अशांतच आहे. तेथी वांशिक विद्वेषाची धग जराही कमी झालेली नाही हेच स्पष्ट झाले. केंद्रातील सरकार जम्मू काश्मीरमधील शांततेचे प्रवचन उठता बसता करत असते. मात्र अलीकडील टार्गेट किलिंगच्या वाढत्या घटनांनी तेथील शांततेचा मुखवटा गळून पडला. आता मणिपूरमधील शांततेचे दडपलेले सत्यही चव्हाट्यावर आले आहे, अशी टीका ठाकरे गटाने केली आहे.

Uddhav Thackeray : ‘दिवाळीवर आरोग्य आणीबाणीचा वरंवटा’ ठाकरे गटाचा सरकारवर घणाघात

मणिपूरविषयीच्या बातम्या मधल्या काळात दिसत नसल्याने चार पाच महिने सलग हिंसाचारात होरपळणारे हे राज्य शांत झाले असावे, असे देशातील जनतेला वाटत होते. मात्र, मंगळवारच्या एका घटनेन हा समज खोटा ठरला आहे. जातीय विद्वेष आणि हिंसाचार त्यातून होणारा रक्तपात, केली जाणारी अपहरणे, हत्याकांडे हे सगळे त्या ठिकाणी आजिबात थांबलेले नाही. मंगळवारी मैतेई समाजाच्या काही लोकांनी पाच जणांचे अपहरण केले. त्यात एक वृद्ध, दोन पुरुष आणि दोन महिलांचा समावेश होता. हे कुटुंबीय एका सैनिकाचे असल्याचे सांगण्यात येत आहे.

मणिपूरवर राज्यकर्त्यांचे मौन

नेहमीप्रमाणे अपहरणकर्ते आणि अपहरण केलेल्यांचा शोध सुरू आहे. अपहरण केलेल्या चौघांचा जीव वाचविण्याचा आणि त्यांची सुखरूप सुटका करण्याचा प्रयत्न सुरू आहे अशी नेहमीची तबकडी सरकारतर्फे वाजविण्यात आली. मात्र या घटनेचे हिंसक पडसाद उमटायचे ते् उमटलेच. कुकी समाजाने प्रतिक्रिया म्हणून त्या भागात निदर्शने केली. काही ठिकाणी गोळीबारही झाला. मणिपूर सरकार आणि केंद्रातील सत्ताधारी मात्र सोयीस्कर मौन बाळगून आहेत, अशी टीका ठाकरे गटाने केली आहे.

Uddhav Thackeray : ‘मी मुख्यमंत्री होईन असं वाटलं नव्हतं पण, शरद पवार’.. उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा

राज्यकर्ते निवडणूक प्रचारात मश्गुल 

follow us