Uddhav Thackeray : ‘दिवाळीवर आरोग्य आणीबाणीचा वरंवटा’; ठाकरे गटाचा सरकारवर घणाघात

Uddhav Thackeray : ‘दिवाळीवर आरोग्य आणीबाणीचा वरंवटा’; ठाकरे गटाचा सरकारवर घणाघात

Uddhav Thackeray : राजधानी दिल्लीसह मुंबईत प्रदूषण प्रचंड (Air Pollution) वाढले आहे. या वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी सरकारकडून काही निर्णय घेतले जात आहेत. मुंबईतही नागरिकांना सूचना दिल्या जात आहेत. ऐन दिवाळी सण तोंडावर आलेला असतानाच या गोष्टी घडू लागल्या आहेत. मुंबईसह 16 शहरांत आरोग्यविषयक आणीबाणीच लागू करण्यात आली आहे. सरकारने रेड अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे आज ठाकरे गटाने (Uddhav Thackeray) सरकारवर खोचक शब्दांत टीका केली आहे. ऐन दिवाळीत लोकांवर बंधने आली. देवासमोर अगरबत्ती लावण्यावरही बंदी आली. सकाळ संध्याकाळचे फिरणे थांबवा. दरवाजे खिडक्या बंदच ठेवा. बारा ते चार घराबाहेर पडू नका. मास्क लावा, घरात झाडू मारू नका. थोडक्यात धनत्रयोदशीपासून सुरू होणाऱ्या दिवाळीवर आरोग्य आणीबाणीचा वरवंटाच फिरवला.  काय हो, राज्यपाल महोदय, हिंदुत्व संकटात आले म्हणून राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एखादे पत्र लिहिता येईल का?, असा खोचक सवाल उद्धव ठाकरे गटाने सामनाच्या अग्रलेखातून विचारण्यात आला आहे.

राज्यातील राजकारणाची गुणवत्ता ढासळली हे खरे आहे. पण मुंबईसह राज्यातील हवेची गुणवत्ताही त्यामुळे ढासळली आहे. मुंबईतचे विषारी गॅस चेंबर झाले आहे. मुंबई हे स्वप्नांचे शहर मानले जाते. मात्र आता या स्वप्ननगरीत प्रदूषणामुळे लोकांना झोप येत नाही. शुद्ध हवेसाठी मुंबईकरांची फुप्फुसे दिवसरात्र झगडत आहेत. त्यामुळे स्वप्ननगरी, मायानगरी हे अलंकार नष्ट होऊन मुंबईचे विषालय झाले आहे. भयंकर प्रदूषणामुळे मुंबईत एकप्रकारे आणीबाणीच लागू झाली असून गचाळ राज्यकर्ते, त्यांचा ढिसाळ व बेफिकीर कारभार मुंबईच्या दुरावस्थेस जबाबदार आहे, अशी जळजळीत टीका ठाकरे गटाने केली आहे.

Uddhav Thackeray : ‘मी मुख्यमंत्री होईन असं वाटलं नव्हतं पण, शरद पवार.. उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा

मुंबईकरांच्या फुप्फुसांत अन् पोटात बांधकामाचे विष

मुंबई-पु्ण्याचे असे गॅस चेंबर होऊनही राज्य सरकार स्वस्थ कसे? गाझापट्टीवर इस्त्रायलने केलेल्या बॉम्बहल्ल्याप्रमाणे मुंबईसह राज्याची भयाण दुर्दशा झाली आहे. मुंबईतील बिल्डरांवर, त्यांच्या बांधकाम प्रकल्पांवर कोणतेही निर्बंध नाहीत. पाडापाडीतून धुरळा उडतो व पुन्हा बांधकामातून सिमेंट उडते. ते विष मुंबईकरांच्या पोटात आणि फुप्फुसांत जाते. मुंबईतील प्रदूषणाचे प्रकरण हायकोर्टात पोहोचले तेव्हा न्यायमूर्तीही भडकले. हा सर्वसामान्य लोकांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. विकासकामांपेक्षा लोकांचा जीव जास्त महत्वाचा आहे. उपाययोजना करा आणि बांधकामामुळे होणारे प्रदूषण येत्या शुक्रवारपर्यंत रोखा, असे न्यायालयाने ठणकावले. पण मुंबईचे पालकमंत्री सगळ्यात मोठे बिल्डर आहेत व त्यांनीच आडवी मुंबई उभी करून सगळ्यात जास्त बांधकाम केले आहे. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळही विष खाऊन पडले आहे, अशी टीका ठाकरे गटाने केली आहे.

सरकारच्या बेफिकीरीने मुंबई विषारी हवेने तडफडतेय

महाराष्ट्राला विषाचे चेंबर करून हे राज्य उद्योगधंदा करण्याच्या योग्यतेचे उरलेले नाही असे विष पसरवून मुंबई आणि महाराष्ट्राला देशोधडीला लावण्याचे कारस्थान कुणी रचत आहे काय. मुंबईसह 16 शहरांत आरोग्य विषयक आणीबाणीच लागू झाली आहे. सरकारने रेड अलर्ट जारी केला. ऐन दिवाळीत लोकांवर बंधने आली. देवासमोर अगरबत्ती लावण्यावरही बंदी आली. सकाळ संध्याकाळचे फिरणे थांबवा. दरवाजे खिडक्या बंदच ठेवा. बारा ते चार घराबाहेर पडू नका. मास्क लावा, घरात झाडू मारू नका. थोडक्यात धनत्रयोदशीपासून सुरू होणाऱ्या दिवाळीवर आरोग्य आणीबाणीचा वरवंटाच फिरवला. काय हो राज्यपाल महोदय हिंदुत्व संकटात आले म्हणून राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एखादे पत्र लिहिता येईल काय?, कोरोना संकटातून वाचवलेले मुंबई शहर सध्याच्या सरकारच्या बेफिकिरीमुळे पसरलेल्या विषारी हवेने तडफडत आहे.

Uddhav Thackeray : शिवसेना तोडली, राष्ट्रवादीने फोडली अन् मिंध्या लाचारांच्या.. ठाकरे गटाचा घणाघात

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज