Download App

Maharashtra Politics: “दंगल घडवण्याची” प्लॅनिंग करण्यासाठी मातोश्रीत बैठक झाली होती

Nitesh Rane On Uddhav Thackeray: १९९३ मध्ये दंगली जशा घडल्या तशीच दंगल आपल्याला घडवायची आहे. (Maharashtra Politics) उद्धव ठाकरेंनी त्या बैठकीमध्ये संबंधित पदाधिकाऱ्यांना चर्नीरोड परिसरातील मुस्लिम फेरिवाल्यांवर हल्ला करावा, (Uddhav Thackeray) त्यानंतर दंगली भडकवण्याची जबाबदारी माझी असणार आहे, (Nitesh Rane ) असे या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे म्हणाले होते.

दंगलीचा फायदा घेऊन मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न त्यांचे होते, असा गंभीर आरोप भाजप आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे त्यांच्यावर केला आहे. आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेत सांगितले आहे की, उद्धव ठाकरे सतत दंगली भडकवण्याचा आरोप करत आहेत. ९ महिन्यापासून आमच्या सरकारवर असे आरोप करत आहेत, पण १३ ऑगस्ट २००४ मातोश्रीत एक बैठक झाली होती.

त्या बैठकीमध्ये स्थानिक लोकाधिकारी समितीचे सरचिटणीस आणि एक खासदार जे आता शिंदेंबरोबर आहेत. त्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांनी दंगली घडवण्याचे प्लॅनिंग केले होते, असा घणाघात आरोप त्यांनी यावेळी केला आहे. तसेच ९ महिने महाराष्ट्रामध्ये अशांतता पसरवण्याचा प्रयत्न होत होता, त्यामध्ये देखील उद्धव ठाकरे आणि त्यांच्या टोळीचा हात आहे का? याची चौकशी गृहखात्याने केली पाहिजे.

Amol Kolhe : जयंत पाटलांना भावी मुख्यमंत्री म्हणणारे कोल्हे म्हणाले, अजितदादा होते म्हणून…

तसेच मालवणी, छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलेल्या घटनेमध्ये उद्धव ठाकरेंचा हात आहे का? याची देखील चौकशी करावी. १९९९ पासून आजपर्यंत उद्धव ठाकरे सतत मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न पाहत आहेत. उद्धव ठाकरे हा किती कपटी आहे, हे मी तारखेसकट आणि पुराव्यासकट बोलत आहे. राज्यामध्ये दंगल घडली तर त्याला जबाबदार उद्धव ठाकरेंनाच धरले पाहिजे, अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी यावेळी केली आहे.

तसेच राऊत आमच्या नेत्यांना भाषण माफिया बोलत असतात, पण तू किती मोठा भूमाफिया आहे? याचे पुरावे महाराष्ट्राला देणार आहोत. अलिबागच्या किहिम बीचवर तुला प्लॉट हवा होतो, म्हणून एका मराठी कुटुंबाला दमदाटी करून ही जमीन बळकावली. किहिम बीचवर रिसोर्ट बांधण्यासाठी कवडीमोल भावात जमीन घेतली आहे.

पक्षासाठी कसरत करणाऱ्यांनी दुसऱ्यावर बोलूच नये; फडणवीसांचा पुन्हा पवारांना टोला

भांडूप, विक्रोळी परिसरात ‘R’ या अक्षरावरून सुरू होणाऱ्या बिल्डरबरोबर तुमचे काय संबंध आहेत, हे लवकरच समोर येईल. तू किती जणांची आतापर्यंत जमीन बळकावली आहे, याचेही उत्तर राऊतांनी द्यावे असं नितेश राणे म्हणाले आहेत. तसेच बेळगावच्या मराठी जनतेला सांगेन, लुटारू, दरोडेखोर, फसवणूक करणाऱ्या माणसाला बळी पडू नका. चपट्या पायाचा घरफोड्या माणसाचे ऐकून चुकीच्या लोकांना मतदान करू नका. बेळगावच्या जनतेने योग्य तो निर्णय घ्यावा, असे आवाहन नितेश राणे यांनी यावेळी केले आहे.

Tags

follow us