Download App

वर्धापनदिन तारखेनुसार, तिथीनुसार की सोयीप्रमाणे? उद्धव ठाकरेंचा भाजपला सवाल

Uddhav Thackeray Inaugurate Shiv Sanchar Sena Sign and nameplate : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (Shiv Sena) पक्षाच्या नव्याने स्थापन झालेल्या ‘शिव संचार सेने’च्या (Shiv Sanchar Sena) बोधचिन्ह आणि नामफलकाचे उद्घाटन आज मातोश्री येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) ह्यांच्या हस्ते करण्यात आले. ह्यावेळी युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे, शिवसेना राज्यसंघटक अखिल चित्रे तसेच इतर पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी बोलताना ठाकरेंनी भाजपवर (BJP) तोफ डागली.

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय की, काळ झपाट्याने पुढे चालला आहे. आधुनिक तंत्रज्ञान आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग झालाय. परंतु यामाध्यमातून कोणाची फसवणूक होता कामा नये. प्रिपेडच्या माध्यमातून होणारी लूट देखील होवू नये, यासाठी आम्ही पुढाकार घेत आहोत. याचं मला समाधान आहे. याचदृष्टीने तंत्रज्ञानाच्या माध्यमातून टाकलेलं हे एक पाऊल आहे.

‘…दोषींवर कठोर कारवाई होणार’, बारामतीत घडलेल्या घटनेवरून अजित पवारांनी भरला सज्जड दम

भाजपच्या वर्धापन दिनावर उद्धव ठाकरे यांनी वर्धापनदिन त्यांच्या तारखेनुसार आहे, तिथीनुसार की सोयीप्रमाणे आहे? असं विचारलं. ते म्हणाले की, आमच्या शुभेच्छा सर्वांनाच असतात. राम नवमी हा तुमच्या पक्षाचा स्थापना (Uddhav Thackeray Criticized BJP) दिवस असेल, तर तुम्ही रामासारखं वागा, असा त्यांनी भाजपाला सल्ला दिलाय. वक्फ बोर्ड पुढे केलं. त्यांच्या जमिनी घेणार, मी आधीच सांगितलं होतं असं देखील ठाकरेंनी म्हटलंय. आता ख्रिस्ती समुदायाकडे वळाले आहेत, त्यानंतर बौद्ध…मग हिंदूच्या जमिनी घेतील. मोक्याच्या जमिनी हे स्वतःच्या मित्रांना देतील, रांगेत सर्वांच्या जमिनी काढणार असं देखील त्यांनी म्हटलंय.

आम्ही आमची भूमिका मांडली. धर्माधर्मात भांडणं लावून दंगली घडवायच्या आहेत, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केलाय. लोकांना तणावग्रस्त वातावरणात जगायला लावायचं आणि त्यांच्या जमिनी काढून घ्यायच्या. महाबोधी विहार, या गोष्टी भाजपने पेटवल्या. भाजप धर्मांधतेचं विष पेरतंय, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केलीय.

Dinanath Mangeshkar Hospital : ‘घटनेतील दोषींवर निश्चितपणे कारवाई …’ केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे आश्वासन

मोहन भागवत यांच्यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, त्यांनी जगताना एकत्र यावं. मेल्यावर काय एकत्र यायचं? विष कालवत आहेत. मराठीत अमराठी करत आहेत. हरियाणात जाट जाटेत्तर केलंय. पटेल पटेलेत्तर करत आहे, जिवंत माणसांसाठी काम करा, असा टोला त्यांनी लगावला आहे.

 

follow us