Uddhav Thackeray : ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. आज मालवणच्या मेळाव्यातून त्यांनी मोदी सरकार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. गद्दारांनी महाराष्ट्र लुटणाऱ्यांना मदत करण्यासाठी मविआ सरकार पाडलं. मात्र, महाराष्ट्रात पुन्हा एकदा शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार, अशी घोषणा त्यांनी केली. तर दिल्लीवाल्यांना महाराष्ट्राचं पाणी दाखवण्याची गरज आहे, अशा शब्दात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाहांवर टीका केली.
पुन्हा सुरू होणार रामायण, उद्यापासून ‘या’ वाहिनीवर मालिका प्रसारित होणार; वेळ जाणून घ्या
आज मालवणच्या मेळाव्यात बोलतांना ठाकरे म्हणाले की, आता मोबाईल, टिव्ही, टेलिफोन आहेत. पण, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात काहीही नव्हतं. अठरा पगड जातीतील मराठी माणूस विखुरला गेल्या होता. समोर औरंगजेबासारखा बलाढ्य शत्रू होता तरीही मुठभर मावळ्यांनी स्वराज्यचं स्वप्न पाहिलं होतं. औरंगजेबासमोर मावळे झुकले नाहीत. निष्ठा आणि निष्ठावंत माणसं ही मूठभर असली, तरी ती वज्रमुठीसारखी असतात. महाराजांकडून तेजाचा, शौर्याचा एक कण जरी आपण घेतला, तरी आपण हुकूमशाहीला गाडून टाकू, असं ठाकरे म्हणाले.
सदा सरवणकर ते गणपत गायकवाड : कायद्याचे धिंडवडे काढणाऱ्या सत्ताधाऱ्यांची यादी मोठी आहे!
यावेळी ठाकरेंनी शिंदे गटावर जोरदार टीका केली. काही गद्दारांनी महाराष्ट्र लुटणाऱ्यांना मदत करायला आणि महाराष्ट्र गिळता यावा म्हणून महाविकास आघाडी सरकार पाडलं, अशी टीका त्यांनी केली. ठाकरेंनी पंतप्रधान मोदींवरही निशाणा साधला. पंतप्रधान संकट काळात कोकणात आले नाही. मात्र, अचानक त्यांना आठवण झाली की, छत्रपती शिवाजी महाराज हे मोठी व्यक्ती होते आणि त्यांनी आरमाराची स्थापना त्यांनी केली. त्यांमुळं सिंधुदुर्ग जिंकायचा असेल तर काहीतरी केलं पाहिजे तरच इथला मतदार मतं देऊ शकतो, असं वाटल्यानं त्यांनी महाराजांचा पुतळा उभारला. आम्हाला अभिमानच आहे. मात्र, शिवजी महाराजांचे भक्त लेचेपेच नाहीत. आमच्या रक्तात छत्रपती शिवाजी महाराज आहेत. अंगामध्ये भगवा आहे. तुमच्या दिखाव्याला आम्ही भुलणारे नाही, असं ठाकरे म्हणाले.
ते म्हणाले, तलवार पेलायला मनगट लागतं, पण तलवार चालण्यासाठी खंबीर मन लागतं. माझी जनता माझ्यासाठी भवानी तलवार आहात. तेव्हा लुटणारे आग्र्यावरून यायचे आता दिल्लीवरून येतात. दिल्लीवरून येणाऱ्यांना महाराष्ट्राचं पाणी पाजायची लायकी नसली तरी महाराष्ट्राचं पाणी दाखवायची गरज आहे, असं ठाकरे म्हणाले. भाजपनं भगव्यात छेद केला. भगव्याला डाग लावला, अशी टीकाही ठाकरेंनी केली.
आता आपल्या अस्तित्वाची नाही, गुंडांच्या अस्तित्वाचाी लढाई आहे. जोपर्यंत निष्ठावंत सोबत आहेत, तोपर्यंत कितीही वादळे येऊ देत, विजय हा भगव्याचाच होणार आहे. छत्रपती शिवाजी मराराजांचा खरा भगवा काय आहे, हे आता लाल किल्ल्यावर फडकवून दाखवणारच. माझं मुख्यमंत्री व्हायचं स्वप्न नव्हत. पण, एक जरूर आता ज्या गद्दारांनी आपलं सरकार पाडलं, त्यांच्या नाकावर टीचून शिवेसनेचा मुख्यमंत्री करून दाखवणार, असा इशाराही ठाकरेंनी दिला.