Uddhav Thackeray Meets CM Devendra Fadnavis : विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदा शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली आहे. या भेटीमुळे सध्या राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.
नागपूर येथे काही वेळापूर्वी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) देखील उपस्थित होते. त्यामुळे राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा नवीन ट्विस्ट येणार का? याबाबत अनेक चर्चांना उधाण आले आहे.
तर दुसरीकडे समोर आलेल्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे यांनी विधानसभा विरोधी पक्षनेते संदर्भात भेट घेतली असल्याची माहिती समोर येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात सात मिनिटे चर्चा झाली असल्याचं देखील बोललं जात आहे. या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना ही भेट केवळ सदिच्छा भेट होती असं उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
आज पक्षप्रमुख मा.श्री.उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस ह्यांची भेट घेऊन, त्यांचे अभिनंदन केले.
ह्यावेळी युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे, विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेना नेते, आमदार अनिल परब, आमदार… pic.twitter.com/rM7EpuTgVu— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) December 17, 2024
माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, आम्ही निवडणूक जिंकू शकलो नाही, महायुतीने निवडणूक जिंकली आहे. त्यामुळे आता महाराष्ट्राच्या हिताची कामे होणार अशी अपेक्षा आहे. हे सरकार कसं आलं ते आम्ही जनतेच्या माध्यमातून आवाज उठवणार आहे. असं उद्धव ठाकरे माध्यमांशी म्हणाले.
एर्टिगा आणि इनोव्हाला विसरा… येत आहे ‘ह्या’ 3 स्वस्त 7-सीटर कार्स, किंमत फक्त 6 लाख रुपये
तर दुसरीकडे या भेटीपूर्वी पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारवर जोरदार निशाणा साधला. तसेच लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना लवकरात लवकर 2100 रुपये देण्यात यावे अशी देखील मागणी केली. याच बरोबर ठाकरे यांनी या पत्रकार परिषदेमध्ये ईव्हीएम विरोधात येणाऱ्या काळात आंदोलन करण्याचा इशारा देखील दिला. विधानसभा निवडणुकीनंतर विरोधक ईव्हीएममध्ये घोळ असल्याचा आरोप करत असून भाजपसह निवडणूक आयोगावर टीका करत आहे.
भेदभाव करू नका, लाडक्या बहिणींना २१०० रुपये द्या; उद्धव ठाकरेंनी सुनावलं