Download App

आमचे गृहमंत्री “फडतूस” नाही “काडतूस”; ठाकरेंच्या टीकेनंतर भाजपचे नेते सरसावले

  • Written By: Last Updated:

Ashish Shelar Tweet After Uddhav Thackeray On Fadanvis : राज्याला एक फडतुस गृहमंत्री लागला अशी टीका राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली होती. त्यानंतर राज्यात पुन्हा एकदा ठाकरे गट विरूद्ध फडणवीस यांच्यात शाब्दीक वाद सुरू झाले आहे. ठाकरेंच्या या टीकेनंतर स्वतः फडणवीसांनी प्रतिक्रिया देत कोण फडतूस आहे हे जनतेला चांगलेच  ठाऊक असल्याचे म्हटले आहे. तर, दुसरीकडे ठाकरेंच्या या टीकेनंतर भाजपचे नेते फडणवीसांसाठी मैदानात उतरले आहे. भाजपचे नेते आशिष शेलार यांनी या टीकेवर ट्वीट करत हल्लाबोल केला आहे. यात त्यांनी  आमचे गृहमंत्री “फडतूस” नाही “काडतूस” असल्याचे म्हटले आहे.

Ghulam Nabi Azad : पंतप्रधान मोदींनी कधीही सूडाच्या भावनेने काम केलं नाही, आझादांकडून मोदींवर कौतुकाचा वर्षाव

शेलारांचं ट्वीट काय?

आमचे गृहमंत्री “फडतूस” नाही “काडतूस” आहेत. मागील अडीच वर्षात ठाकरे सरकारचा फडतूस कारभार महाराष्ट्राने पाहिला. कोणत्याही मारहाणीचे समर्थ होत नाही, आम्ही ते करणारही नाही. पण या अशा खुनशी कारभाराची मुहूर्तमेढ महाराष्ट्रात मा. उध्दव ठाकरे यांनीच रोवली.

निवृत्त नेव्ही अधिकाऱ्यांचा डोळा फोडण्यापासून, पत्रकारांना घरात घुसून अटक करण्यापर्यंत, लोकांची घरे तोडणे, खोटे गुन्हे दाखल करणे, केंद्रीय मंत्र्यांना अटक करणे… हे फडतूस उद्योग कुणी केले उध्दवजी? आम्ही त्याचवेळी हे सांगत होतो की कद्रु मनाने फडतूस कारभाराचे जनक होऊ नका असे म्हणत शेलारांनी ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.

उद्धव ठाकरेंची टीका काय? 

काल ठाकरे गट (Thackeray group) आणि शिंदे गट (shinde) यांच्यामध्ये ठाण्यात जोरदारा राडा झाला. ठाण्यात शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्या रोशनी शिंदे यांच्यावर हल्ला करत मारहाण केली. यात रोशनी या जबर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर ठाण्यातील संपदा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सपत्नीक रोशनी शिंदे (Roshni Shinde) यांची भेट घेतली. त्यानंतर ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल केला.

Devendra Fadanvis फडतुस शब्दांवरुन भडकले : ठाकरेंना थेट धमकीच दिली…

ठाकरे म्हणाले की, ठाण्याची ओळख शिवसेनेचं, बाळासाहेबांच आणि आनंद दिघेंचं सुशिक्षित, सुसंस्कृत ठाणं अशी ओळख होती. मात्र, आता ही ओळख पुसत चालली असून गुंडाचं ठाणं ही ठाण्याची नवी ओळख बनत चालली आहे. ठाण्यात आता तर महिला देखील गुंडगिरी करायला लागल्या आहेत. त्यामुळं ठाण्याचं काय होणार हा प्रश्न आहे. तोतयेगिरी आणि गुंडगिरी करणाऱ्यांची संख्या ठाण्यात जास्त आहेत. हा मिंधे गट महिलांकरवी हल्ले घडवून आणत आहे. सुप्रीम कोर्टान म्हणालं होतं की, राज्य सरकार नपुसंक आहे. तसे हे हल्ले करणारे देखील नपुसंक आहेत, अशी टीका ठाकरेंनी केली.

 

Tags

follow us