Ghulam Nabi Azad : पंतप्रधान मोदींनी कधीही सूडाच्या भावनेने काम केलं नाही, आझादांकडून मोदींवर कौतुकाचा वर्षाव

  • Written By: Published:
Ghulam Nabi Azad : पंतप्रधान मोदींनी कधीही सूडाच्या भावनेने काम केलं नाही, आझादांकडून मोदींवर कौतुकाचा वर्षाव

राज्यसभा न मिळाल्यामुळे काँग्रेसमधून बाहेर पडून नवा पक्ष स्थापन केलेल्या गुलाम नबी आझाद यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले आहे. गुलाम नबी आझाद तब्बल पाच दशकाहून अधिक काळ काँग्रेसचे नेते होते. पण काँग्रेसवर नाराज होत त्यांनी नवा पक्ष स्थापन केला आहे. ते भाजपच्या सोबत जातील अशा शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी नरेंद्र मोदी यांचं केलेलं कौतुक आता चर्चेचा मुद्दा ठरत आहे.

Devendra Fadanvis फडतूस शब्दांवरुन भडकले : ठाकरेंना थेट धमकीच दिली…

नरेंद्र मोदींचे काम एका महान राजकारण्यासारखे असल्याचे म्हटले आहे, असे म्हणत गुलाब नबी आझाद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले आहे. एएनआयला दिलेल्या मुलाखतीत ते पुढे म्हणाले की, ‘मी मोदींना श्रेय देऊ इच्छितो. मी त्याच्यासोबत कसेही वागलो असलो तरी विरोधी पक्षनेता म्हणून त्यांनी सौहार्दपूर्ण काम केलं आहे. विरोधी पक्षनेता म्हणून मी त्यांना CAA, हिजाब वाद आणि कलम 370 सारख्या मुद्द्यांवर खूप घेरले. पण पंतप्रधान मोदींनी कधीही सूडाच्या भावनेने कृती केली नाही.”

गुलाम नबी आझाद यांनी यावेळी काँग्रेसची  G -२३ कमिटी ही भाजपचा मुखवटा असल्याच्या आरोपांवरही त्यांनी उत्तर दिले. त्यावर ते म्हणाले की G-23 जर भाजपचे प्रवक्ते असतील तर काँग्रेस त्यांना खासदार का करते? त्यांना खासदार, सरचिटणीस पदांवर का ठेवण्यात आले आहे? काँग्रेसमधून बाहेर पडून पक्ष स्थापन करणारा मी एकमेव व्यक्ती आहे. बाकी नेते अजूनही तिथेच आहेत. अशा प्रकारचे आरोप द्वेषाने भरलेले आहेत.  याचवेळी त्यांनी भाजपशी जवळीक असल्याचा आरोपही फेटाळून लावला.

सगळ्यात टवाळखोर पक्ष म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, शेलारांचा पलटवार

गुलाम नबी आझाद यांनी गेल्या वर्षीच काँग्रेसशी संबंध तोडून जम्मू-काश्मीरमध्ये स्वत:चा डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पक्ष स्थापन केला होता. पक्ष सोडताना त्यांनी काँग्रेसच्या दुरावस्थेसाठी राहुल गांधींना जबाबदार धरले होते. राहुल गांधींनी २०१३ मध्ये फाडलेल्या अध्यादेशामुळे त्यांची प्रतिमा मलीन झाली होती, असे आझाद म्हणाले होते. गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसवर गुंडांना महत्त्व देत जुन्या लोकांना बाजूला सारल्याचा आरोपही केला होता. हे सर्व आरोप त्यांनी सोनिया गांधी यांना उद्देशून लिहलेल्या राजीनामा पत्रात केले होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube