Uddhav Thackeray : सध्या जामिनावर असलेले राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी हिवाळी अधिवेशनाला हजेरी लावली होती. ते सत्ताधाऱ्यांच्या बाकावर बसले होते. त्यामुळे भाजपची मोठी कोंडी झाली होती. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अजित पवार यांना पत्र लिहून मलिक यांना महायुतीत घेणं योग्य होणार नाही, असं सांगितलं. यावर आता ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाष्य केलं.
तब्बल 17 वर्षांनी ‘चौहान’ राज संपुष्टात! मोहन यादव होणार मध्यप्रदेशचे नवे मुख्यमंत्री
आज हिवाळी अधिवेशनासाठी नागपुरात आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली. यावेळी त्यांना फडणवीसांनी अजित पवारांना लिहिलेल्या पत्राविषयी विचारले. त्यावर बोलतांना ते म्हणाले की, सध्या पत्राचा जमाना आहे. आम्ही निवडणूक आयोगाला पत्र दिलं. धर्माच्या नावाने, देवाच्या नावाने मत भाजपने मागितली. हा मत मागण्याचा अधिकार आहे का, यावर अजूनही आयोगाने उत्तर दिलं नाही, असं ते म्हणाले. दरम्यान, एका उपमुख्यमंत्र्यांनी दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांना पत्र दिलं आहे. सत्तापेक्षा देश मोठा, ही देशभक्तीची भावना जागा झाली. त्याचं स्वागतचं. पण, जो न्याय नवाब मलिकांना लावताय, तोच न्याय प्रफुल्ल पटेल यांना लावणार का, असा सवाल करत ठाकरेंनी भाजपला घेरलं
अदिती राव हैदरी हिने ज्युबिली अन् ताजसाठी जिंकला लोकप्रिय अभिनेत्री-वेब मालिका सन्मान
सरकारमुळं शेतकऱ्यांवर अवयव विकायची वेळ
ते म्हणाले, राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. शेतकऱ्यांवर एकापाठोपाठ संकट येत आहेत.अवकाळी पाऊस, गारपीट याने शेतकरी हतबळ झाला असून पीक विमा कंपन्यांनी आपली दारं-खिडक्या शेतकऱ्यांसाठी बंद केली आहेत. सरकारने दिवाळी पर्यंत पीक विम्याची रक्कम मिळेल, असं सांगितलं. मात्र, किती शेतकऱ्यांना मदत मिळाली आणि किती रुपये रक्कम मिळाली?दोन दोन, तीन तीन रुपये मदत मिळाली, हे शेतकऱ्यांची थट्टा आहे.. शेतकऱ्यांच्या कर्ज वसुलीसाठी बॅंका मागे लागल्या. त्यामुळं काही शेतकरी अवयव विकायला निघाले होते. या आधी शेतकऱ्यांवर कधी ही वेळ आली नाही, मात्र या सरकारनं शेतकऱ्यांवर अवयव विकायची वेळ आणली, अशी टीका ठाकरेंनी केली.
सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी गुंडगिरी करत आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न तयार झाला, असंही ते म्हणाले.
सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला आहे. याच मुद्यावरून ओबीसी आणि मराठा यांच्यात संघर्ष उभा राहिला. याविषयी विचारले असता ठाकरे म्हणाले की, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून शिवसेनेच्या खासदारांनी राष्ट्रपतींची भेट घेतली आहे. कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे, असं ते म्हणाले.