Download App

शिंदे यांच्या विरोधात ठाकरेंच्या हाती मोठे गुपित; राजीनाम्याची करणार मागणी

मुंबई : उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील संघर्ष विकोपाला जाण्याची चिन्हे नागपूर येथील विधिमंडळ अधिवेशनात दिसून येत आहेत. उद्धव यांचे पुत्र आदित्य आदित्य यांना अडचणीत आणण्यासाठी शिंदे गट आणि भाजप यांनी जोरदार डावपेच टाकल्याने त्याला प्रत्युत्तर म्हणून उद्धव ठाकरे हे आज विधान परिषदेत बोलण्याची शक्यता आहेत.

एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध ठाकरे मोठा बॉम्बस्फोट ते करणारा असून त्यांच्या राजीनामेची मागणी करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ठाकरे कुटुंबाला शिंदे सेनेकडून सातत्याने टार्गेट करण्यात येत आहे. सत्ता तर हिसकावून घेतली पण त्यासोबतच आदित्य आणि उद्धव यांना चौकशीच्या फेऱ्यात अडकविण्याची चर्चा आणि तसे निर्णय विधिमंडळाच्या पटलावर घेण्यात आले. त्यामुळेच शिवसेना आता यांच्या विरोधात आक्रमक झाले आहे.

दरम्यान खुद्द उद्धव हे आता रिंगणात उतरले आहेत. शिंदे यांच्या कोणत्या फायली ते काढणार आणि राजीनामेची मागणी करणार हे थोड्याच वेळात कळेल. सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर असून ते दुपारी 4 पर्यंत परतणार आहे. मात्र तोवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधान परिषदेत किल्ला लढवणार आहे.

Tags

follow us