Download App

‘तुला लाज नाही लज्जा नाही फक्त बडबडतो’ उद्धव ठाकरेंचा भर सभेत नारायण राणेंवर घणाघात

Uddhav Thackeray On Narayan Rane : रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात आज महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ आज

Uddhav Thackeray On Narayan Rane : रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा (Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha) मतदारसंघात आज महाविकास आघाडीचे (MVA) उमेदवार विनायक राऊत (Vinayak Raut) यांच्या प्रचारार्थ शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी जाहीर सभा घेतली. या जाहीर सभेत बोलताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी महायुतीचे उमेदवार आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्यासह नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

शुभ बोल रे नाऱ्या अशी म्हण म्हणत नारायण राणे यांच्यावर उद्धव ठाकरे यांनी जोरदार हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे म्हणाले आज सकाळी मला कोणी तरी धमकी दिली की कोण इथं येतो बघतो, मी येऊन उभा आहे, तू आडवा येच तुला गाडूनच पुढे जातो अशा थेट इशारा उद्धव ठाकरे यांनी नारायण राणेंना दिला.

तुला लाज वाटली पाहिजे यापूर्वी देखील इकडे येऊन तुला आडवा केला त्यानंतर माझ्या घराकडे तुला साफ केला, लाज नाही लज्जा नाही फक्त बडबडतो म्हणून म्हणतो शुभ बोल रे नाऱ्या असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी नारायण राणे यांचा समाचार घेतला.

आज रत्नागिरीमध्ये जे आपल्याला नकली म्हणतात त्या बेअकली पक्षाचे एक नेते यांनी मला एक आव्हान देऊन गेले हिम्मत असेल तर याच्यावर बोला त्याच्यावर बोला मात्र अमित शहा तुमच्यात हिम्मत असेल तर तुम्ही जनतेच्या प्रश्नांवर बोला असं म्हणत अमित शहा यांच्यावर उद्धव ठाकरे यांनी टीका केली. कोंबडीचोर बरोबर घेतलाय तरी अंडी काही बाहेर येत नाहीयेत, त्यावर बोला. तुमच्या पेक्षा कोंबडं बरं. राम मंदिर बांधलं हे चांगलंच केलं. पण तुमची हिंमत नव्हती, तेव्हा शिवसेना पुढे होती. तुम्ही गेल्या 10 वर्षापासून सत्तेत आहे तरीही तुम्ही काय करू शकले नाही.

बाळासाहेब तुमच्या वर्गात होते का?

राम मंदिर बांधण्यासाठी बाळासाहेबांनी पुढाकार घेतला. तुम्ही म्हणतात बाळासाहेब, मोदी म्हणतात बाळासाहेब, बाळासाहेब तुमच्या वर्गात होते का? तुम्ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब असं म्हणा असा शब्दात त्यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या समाचार घेतला.

सारखे नाव असणाऱ्यांना निवडणूक लढण्यापासून रोखू शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली याचिका

राम मंदिरसाठी आम्ही तुम्हाला पाठिंबा दिला. मी राम मंदिरात जाऊन आलो मात्र तुम्ही भवानी मंदिरात का गेले नाही? असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला.

follow us