Uddhav Thackeray Palghar Sabha: शिवसेना पक्षप्रमुख >उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पालघर येथे महायुतीच्या उमेदवार भारती कामडी यांच्यासाठी सभा घेतली. या सभेत ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय. महाराष्ट्रात नरेंद्र मोदींचे नाणे चालणार नाही. महाराष्ट्रात ठाकरे, शरद पवार (Sharad Pawar) यांचे नाणे चालणार असल्याचा दावा उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
नकली शिवसेना असायला काय ती तुमची डिग्री आहे का? ठाकरेंचा मोदी, शाहांवर जोरदार पलटवार
उद्धव ठाकरे म्हणाले, त्यांनी शिवसेना, राष्ट्रवादी फोडली आहे. त्यांच्याबरोबर मिंधे गेले आहेत. अजित पवार तुम्ही ही तिकडे गेलात. पण तुमच्यापेक्षा शरद पवारांना महाराष्ट्र मानतो. शिवसेनेचा दरार आहे. दरम्यान उद्धव ठाकरे यांनी पीएम फंडावरून नरेंद्र मोदींवर जोरदार निशाणा साधला आहे. तुम्ही आमच्यावर ईडी, सीबीआयची कारवाई करता. ही यंत्रणा तुमची घरगडी असल्यासारखी वागते. अमोल कीर्तिकर निवडून येतील म्हणून तुम्ही कारवाई केली आहे. त्यांचे नाव जाहीर झाल्यानंतर लगेच तुम्ही ईडी चौकशी लावली आहे. ज्यांना खरा खिचडी घोटाळा केला आहे ते मिंध्याबरोबर असल्याचे आरोपाही ठाकरे यांनी केला आहे.
एका बाजूला राजा, दुसऱ्या बाजूला माथाडी कामगारांचा उमेदवार; साताऱ्याच्या लढतीवर पवारांचं वक्तव्य…
निवडणूक रोख्यातील आठ हजार रुपये तुम्ही खावून टाकले आहेत. पीएम केअर फंडाचे कोट्यवधी रुपये आहेत. हा फंड खासगी आहे, या फंडाची चौकशी करायला हवी. पंतप्रधानपदावरून मोदी खाली उतरल्यानंतर हा फंड कुणाच्या ताब्यात जाणार आहे हे सांगावे, अशी टीकाही ठाकरे यांनी केली आहे. अडीच वर्षांच्या मुख्यमंत्री कालावधीचा हिशोब देतो. पंतप्रधानांनी दहा वर्षांच्या कालावाधीतील कामांचा हिशोब द्यावे, असे चँलेज उद्धव ठाकरे यांनी दिले आहे.
ठाकरेंचा लोकलमधून प्रवास
बोईसरमधील सभा संपल्यानंतर उद्धव ठाकरे हे बोईसर रेल्वे स्टेशनवर आले. त्यामुळे स्टेशनवर कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. त्यांनी घोषणाबाजी केली. त्यानंतर उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, मिलिंद नावर्वेकर यांनी लोकल रेल्वेने बोईसर ते वांद्रे असा रेल्वेने प्रवास केला आहे.