Download App

Uddhav Thackeray : मोदींचं स्वागत, त्यांनी आता मनोज जरांगेंना भेटावं; उद्धव ठाकरेंनी काय सांगितलं ?

Uddhav Thackeray : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत असतानाच पंतप्रधान मोदी (PM Modi) महाराष्ट्रात आले आहेत. आज दुपारी मोदी यांचे शिर्डीत आगमन झाले. येथे त्यांनी साईबाबांचे दर्शन घेतले तसेच विविध विकासकामांचे लोकार्पण केले. मोदींच्या या दौऱ्यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनीही पीएम मोदींच्या दौऱ्यावर प्रतिक्रिया देत एक मागणी केली आहे. उद्धव ठाकरे यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याबाबत प्रश्न विचारला. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले, आता मोदींनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन मराठा आरक्षणाचा विषय सोडवावा, ही माझी त्यांना विनंती आहे.

ज्या कालव्याचे काम पूर्णच झालेले नाही, त्याचे लोकार्पण कसे? निळवंडेवरुन तनपुरेंचा सवाल

मागील काही दिवसांपासून ठाकरे गटातही इनकमिंग वाढली आहे. यावर विचारले असता ठाकरे म्हणाले, आमच्या पक्षातून बाहेर जाणारे सत्तेच्या दिशेने जात आहेत तर पक्षात येणारे सत्ता आणण्याच्या दिशेने येत आहेत. काल एकनाथ पवार भाजपातून आले. आज चंगेज खान आले. येत्या काही दिवसांत आणखीही येतील. राजकारणाचा झालेला खेळखंडोबा कुणालाही पटत नसल्याने ते येत आहेत, असे ठाकरे म्हणाले.

मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषण सुरू केले आहे. आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ राज्यात ठिकठिकाणी आंदोलने सुरू झाली आहेत. राजकीय नेते, लोकप्रतिनिधींना गावबंदी करण्याचा निर्णय अनेक गावांत घेण्यात आला आहे. सरकारी पातळीवर काय हालचाली सुरू आहेत याची माहिती अद्याप मिळालेली नाही. सत्ताधारी गटातील नेत्यांनी मराठा समाजाला आरक्षण देणारच. त्यासाठी सरकारला थोडा वेळ द्या अशी मागणी केली होती. मात्र, जरांगेंनी निर्धार कायम ठेवत उपोषण सुरू केले आहे. यानंतर आता सरकारी पातळीवर काय घडामोडी घडतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

पीएम मोदींच्या हस्ते निळवंडे कालव्याचे लोकार्पण 

आज दुपारी पंतप्रधान मोदींचे शिर्डीत आगमन झाले. यावेळी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते. यानंतर मोदींनी शिर्डीतील साई मंदिरात जाऊन साईबाबांचे दर्शन घेतले. या दौऱ्यात मोदींच्या हस्ते 7500 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले. तसेच 86 लाखांहून आधिक शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ आणि निळवंडे धरणाचे जलपूजन करून कालव्यांचे लोकार्पण करण्यात आले.

Maratha Reservation : ‘जरांगेंनी वेळ दिला होता तेव्हा झोपा काढल्या का?’ मनसे आमदाराचा सरकारला सवाल

follow us