Download App

SambhajiRaje Chatrapati : शिवरायांची शपथ घेऊन सांगतो मला उद्धव ठाकरेंनी…

मुंबई : मी आणि उद्धव ठाकरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर उभं राहतो अन् शपथ घेऊन सांगतो मला उद्धव ठाकरे यांनी फसवलं असल्याचा आरोप संभाजीराजे छत्रपती यांनी केला आहे. एका मुलाखतीदरम्यान बोलताना संभाजीराजेंनी उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

संभाजीराजे म्हणाले, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षांच्या राजकीय दृष्ट्या अनेक प्रश्न आहेत. त्यामुळे स्वराज्य संघटनेला जागा तयार करण्यासाठी संधी मिळणार असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला आहे.

राऊत हे शकुनी मामा… सेना पवारांनीच फोडली; राम शिंदेचे गंभीर आरोप

शिवसेना फुटली असून राष्ट्रवादी काँग्रेसमध्यही आता पूर्वीसारखं वातावरण राहिलेलं नाही. तर दुसरीकडे काँग्रेसही बुडीत जहाज असल्याचा अनेकजण दावा करत असल्याचं त्यांनी म्हंटलय. राज्यात असलेल्या राजकीय पक्षांसमोर राजकीय दृष्ट्या अनेक प्रश्न उपस्थित असल्याचंही भाकीत त्यांनी केलंय.

Sambhaji Raje Chhatrapati म्हणाले, खासदारकीचं स्वप्न पूर्ण झालं अन् वडिलांना मिठी मारली

स्वराज्य ही संघटना काढणार याबाबत मी खासदार होण्याआधीच घोषित केलं होतं. मी कोणत्याही पक्षाशी संबंधित नाही. त्यामुळे कोणत्या पक्षात काय वाद, त्यामुळे आम्हाला काय फायदा याकडं मी लक्ष देत नाही. शिवसेनेत सुरु असलेल्या वादात मला पडायचं नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

फडणवीस अन् पवारांचं राजकारण कसं? Sambhaji Raje Chhatrapati यांनी स्पष्ट सांगितलं

भाजप आता दहा बारा वर्षांपासून सत्तेत आहे, लोकांना पंतप्रधान मोदींकडून ज्या अपेक्षा होत्या, त्या पूर्ण झालेल्या नाहीत. त्यामुळे या गोष्टींचा आगामी काळात आमच्या पक्षाला फायदा होणार असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. दरम्यान, मी शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगतो मला उद्धव ठाकरे यांनी फसवलं असल्याचंही त्यांनी या मुलाखतीदरम्यान स्पष्ट केलं आहे.

आदित्य ठाकरे यांची कशी पंचाईत झाली, कोश्यारी यांनी रंगवून सांगितले

राज्यसभेच्या निवडणुकीदरम्यान संभाजीराजे छत्रपतींनी राज्यातील सर्व पक्षीयांना पाठिंबा देण्याबाबत आवाहन केलं होतं, मात्र उद्धव ठाकरे यांनी तुम्ही शिवसेनेत प्रवेश करा त्यानंतरच आम्ही पाठिंबा देणार असल्याची भूमिका घेतली होती. या संपूर्ण घडामोडीवर आज संभाजीराजेंनी उध्दव ठाकरे यांच्यावर फसवलं असल्याचा गंभीर आरोप केला आहे.

Tags

follow us