फडणवीस अन् पवारांचं राजकारण कसं? Sambhaji Raje Chhatrapati यांनी स्पष्ट सांगितलं

फडणवीस अन् पवारांचं राजकारण कसं? Sambhaji Raje Chhatrapati यांनी स्पष्ट सांगितलं

मुंबई : राज्याच्या राजकारणातील नेते मंडळी एकमेकांचे आलेले अनुभव मुलाखतीतून सांगत असतात. असाच एक स्वराज्य संघटनेचे प्रमुख अनुभव संभाजीराजे छत्रपती यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्याबद्दल सांगितला आहे. देवेंद्र फडणवीसांसोबत कितीही चांगले संबंध असतील, पण ते माझ्या पाठीमागे काय करत असतील मला माहित नसल्याचं संभाजीराजेंनी एका मुलाखतीद्वारे सांगितलंय.

संभाजीराजे म्हणाले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत माझे चांगले संबंध असून माझ्या पाठीमागे ते काय करत असतील हे मला माहित नसल्याचं ते म्हणाले आहेत. अर्थात फडणवीसांच्या राजकारणाचा कोणीच अंदाज लावू शकत नसल्याची शक्यता संभाजीराजेंनी वर्तवली आहे.

Sambhaji Raje : संभाजीराजे 2024 च्या तयारीला, पदाधिकाऱ्यांची निवड करत रणशिंग फुंकले

शरद पवारांनी मला 2009 मध्ये राष्ट्रवादीकडून लोकसभेची उमेदवारी दिली होती. त्यामध्ये मला पराभव पत्करावा लागला होता. मात्र, त्यांनी राज्यसभेत अनेकदा माझी प्रशंसा केल्याचं संभाजीराजेंनी स्पष्ट केलंय. मराठा समाजाच्या ऐरणीवर राज्यसभेत बोलण्याचा विषय होता, त्यावेळी तुम्ही छत्रपती शाहु महाराजांचे वंशज आहात राजे तुम्हीचं बोललं पाहिजे, असं मला त्यांनी सांगितलं होतं.

Udhav Thackeray : निवडणूक आयोगाने दोन गट मान्य केले, शिंदे गटाचा व्हिप लागू होत नाही

शरद पवार आणि फडणवीस उच्चस्तरीय नेतृत्व करतात. दोघांची काम करण्याची पध्दत मी पाहिलीय, दोघंही कष्ट करतात. एक जण सकाळी लवकर उठतो तर दुसरा रात्री उशिरापर्यंत काम करतो, या शब्दांत त्यांनी चिमटाही काढला आहे. दोघांच्या काम करण्याच्या पध्दतीवरुन आपण त्यांच्याकडून शिकलं पाहिजे दोघांची कार्यकर्त्यांना सांभाळण्याची पध्दत चांगली असल्याचंही त्यांनी म्हंटलंय.

IND vs AUS: सलग पराभवानंतर ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का, दोन दिग्गज खेळाडू कसोटी मालिकेतून बाहेर

पवार आणि फडणवीस या दोन्ही नेत्यांनी उंचीवर पोहोचण्यासाठी त्यांनी खूप कष्ट केले आहेत. दोघेही नेते हाय टॉप ब्रास आहेत. दोघांच्याही राजकारणाचा अंदाज येत नसल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे. पवार आणि फडणवीस माझ्यामागे काय हालचाल करीत असतील ते मला माहित नसल्याचंही त्यांनी म्हंटलंय.

राज्याच्या राजकारणातल्या या दोन्ही नेत्यांकडून मला वाईट अनुभव आले नसल्याचं त्यांनी ठामपणे सांगितलं असून कोणाला वाईट अनुभव आले असतील तर मला माहित नसल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं आहे. दोन्ही नेत्यांनी आणखी मोठं व्हावं आणि आम्हाला वाव द्यावा, असंही ते म्हणालेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube