IND vs AUS: सलग पराभवानंतर ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का, दोन दिग्गज खेळाडू कसोटी मालिकेतून बाहेर
दिल्ली : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चार सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. दिल्ली कसोटीतील पराभवानंतर सोमवारी आणखी एक वाईट बातमी समोर आली आहे. एका वृत्तानुसार, जोश हेजलवूड दुखापतीमुळे भारताविरुद्धच्या संपूर्ण मालिकेतून बाहेर पडला आहे. हेझलवूडसोबत डेव्हिड वॉर्नरलाही ऑस्ट्रेलियात पाठवले जाऊ शकते. त्याच वेळी, पॅट कमिन्स कौटुंबिक समस्यांमुळे आधीच परदेशी परतला आहे.
भारताविरुद्धच्या दिल्ली कसोटीत ऑस्ट्रेलियाला पराभवाचा सामना करावा लागला होता. यानंतर कर्णधार पॅट कमिन्स कौटुंबिक समस्यांमुळे परदेशी परतला आहे. यानंतर सोमवारी हेजलवूड मालिकेतून बाहेर असल्याची बातमी आली. फॉक्स क्रिकेटच्या एका बातमीनुसार, हेजलवूड दुखापतीमुळे भारताविरुद्धच्या संपूर्ण मालिकेतून बाहेर पडला आहे. त्याच्यासोबत डेव्हिड वॉर्नरलाही ऑस्ट्रेलियात पाठवले जाऊ शकते. वॉर्नरच्या कोपरात फ्रॅक्चर झाले आहे. त्यामुळे ते एकत्रही जाऊ शकतात.
Sharad Pawar : पवारांनी लवासाबद्दल दहावेळा विचार करायला पाहिजे – भगतसिंह कोश्यारी
ऑस्ट्रेलियन संघ खराब फॉर्ममधून जात आहे. भारताच्या खेळपट्ट्यांमध्ये संघाचे खेळाडू आतापर्यंत अपयशी ठरले आहेत. अशा स्थितीत संघाच्या प्रमुख खेळाडूंची अनुपस्थिती नुकसानीची बाब आहे. भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला एक डाव आणि 132 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. हा सामना नागपुरात झाला. यानंतर दुसरा सामना दिल्लीत झाला. यामध्ये ऑस्ट्रेलियाला 6 विकेट्सने दारूण पराभव स्वीकारावा लागला होता.