Sharad Pawar : पवारांनी लवासाबद्दल दहावेळा विचार करायला पाहिजे – भगतसिंह कोश्यारी
मुंबई : महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नुकतचं आपल्या राज्यापाल पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच एका वृत्त वाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाच्या कार्यकाळातील काही गौप्यस्फोट केले आहेत. कोश्यारी यांना यावेळी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांच्या पहाटेच्या शपथविधीबद्दल शरद पवारांच्या भूमिकेबद्दल विचारले असता ते म्हणाले की, शरद पवारांचं लवासाचं प्रकरण हायकोर्टात आहे. त्याबद्दल त्यांनी दहावेळा विचार करायला पाहिजे. ते मोठे व्यक्ती आहेत मी त्यांचा सन्मान करतो. पण ते जे काही बोलतात ते राजकीय असंत. असं भगतसिंह कोश्यारी म्हणाले.
Bhagat Singh Koshyari : इच्छा नसतानाही महाराष्ट्रात आलो, कोश्यारींचा राजीनाम्यानंतर गौप्यस्फोट!
त्याचबरोबर ते म्हणाले मला 4 वर्ष 4 महिने महाराष्ट्रासारख्या एका मोठ्या राज्याच्या राज्यपाल पदाचा पदभार सांभाळायची संधी मिळाली. पंतप्रधान नरेंद्र मोदींना माझ्यवर विश्वास होता. पण मी त्यांचा आदर करत असल्याने आणि महाराष्ट्रासारख्या संतांच्या भूमीवर जेवढे दिवस सेवा करायला मिळेल तेवढं चांगलं. त्यामुळे माझी इच्छा नसतानाही मी देवभूमीहून महाराष्ट्रासारख्या संतांच्या भूमीवर आलो.
या ठिकाणी आल्यावर ज्याप्रमाणे राजकारणात 2 आणि 2 मिळून 4 होईलच असं नाही ते 3 ही होऊ शकतात. त्याप्रमाणे इतर राज्यातही होतं तसं महाराष्ट्रातही झालं. मी प्रत्यक्ष राजकराणात उशिरा आलो पण अनेक वर्ष राजकारण पाहिलं आहे. असं यावेळी महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे म्हणाले.