Download App

Nilesh Rane : उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांना ब्लॅकमेल करायचे…

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची गुढी पाडव्यानिमित्त आयोजित सभा नुकतीच पार पडली. यावेळी राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. तसेच यावेळी त्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) आणि दिवंगत नेते बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे काही किस्से सांगितले. यातच एका किस्स्यांवरून राज यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टीका केली. आता याच अनुषंगाने राणे यांचे सुपुत्र निलेश राणे (Nilesh Rane) यांनी राज ठाकरेंच्या वक्तव्याचे समर्थन करत ठाकरेंवर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे ज्याप्रकारे स्व. बाळासाहेबांना ब्लॅकमेल करायचे हे शब्दात सांगणं शक्य नसलं तरी राज साहेबांमुळे महाराष्ट्राला कळले, अशा आशयाचे ट्विट निलेश राणे यांनी केले आहे.

आगामी निवडणुका पाहता राज्यात विविध पक्षातील नेतेमंडळींनी जाहीर सभा घेण्याचा धडाका सुरु केला आहे. यातच काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांची सभा पार पडली होती. त्यापाठोपाठ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील सभा पार पडली. नुकतेच गुढी पाडव्याच्या निमित्ताने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा पार पडली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवरून राजकारणी मंडळींवर टीका केली.

यावेळी राज ठाकरे यांनी शिवसेनेचे दिवंगत नेते बाळासाहेब ठाकरे व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा एक किस्सा सांगितला. नारायण राणे तसेच मला शिवसेनेतून बाहेर पडायचे नव्हते असेही राज ठाकरे म्हणाले. बाळासाहेबांना भेटण्यासाठी नारायण राणे जाणार मात्र कोणाच्यातरी सांगण्यावरून बाळासाहेबांनी त्यांना भेटण्यास नकार दिला. राज यांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

याच मुद्द्यावरून आता नारायण राणे यांचे सुपुत्र भाजपचे माजी खासदार निलेश राणे यांनी राज ठाकरे यांच्या वक्तव्याचे समर्थन करत राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. राणे यांनी ट्विटद्वारे उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

निलेश राणे यांचे ट्विट नेमकं काय?
काल राज साहेबांनी राणे साहेबांबद्दल जे सांगितलं ते महाराष्ट्राला कळणं गरजेचं होतं. उद्धव ठाकरे ज्याप्रकारे स्व. बाळासाहेबांना ब्लॅकमेल करायचे हे शब्दात सांगणं शक्य नसलं तरी काल राज साहेबांमुळे महाराष्ट्राला कळले. उद्धव ठाकरेंच्या साध्या चेहऱ्यामागे एक भयानक माणूस लपला आहे.

दरम्यान उद्धव ठाकरे व राणे कुटुंबीय यांच्यातील वाद काही नवा नाही आहे. वेगवेगळ्या मुद्द्यांवरून ठाकरे व राणे हे एकमेकांवर आरोप – प्रत्यारोप करत असतात. यातच सध्या राज ठाकरे यांनी केलेल्या काही खुलास्यावरून निलेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर शाब्दिक टीका केली आहे. used to …Nilesh Rane’s statement

Tags

follow us